Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का; आणखी एका राजकीय घराण्यात फूट; आमदार पुत्र भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

Sangli Politics NCP Mla Son Join BJP: पुणे पदवीधर मतदारसंघावर भाजपचा डोळा असून त्यांनी तसा डाव खेळत राष्ट्रवादीला धोबीपछाड केलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आणि जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आमदाराच्या घरात सुरुंग भाजपनं लावलाय. आमदाराच्या पुत्रला गळाला लावत भाजपमध्ये आणलंय.
Sangli Politics NCP Mla Son Join BJP
Sharad Lad, son of NCP MLA Arun Anna Lad, set to join BJP on October 7 in Mumbaisaam tv
Published On
Summary
  • सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का, शरद लाड भाजपमध्ये जाणार.

  • अरुण अण्णा लाड यांचे सुपुत्र शरद लाड ७ ऑक्टोबरला मुंबईत भाजप प्रवेश करणार.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद लाड यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दिला.

सांगली जिल्ह्यात भाजपनं राष्ट्रवादीला एक मोठा धक्का दिलाय. भाजपनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आमदाराच्या पुत्राला गळा लावलंय. पुणे विभाग पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड यांचे सुपुत्र शरद लाड हे भाजपमथध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. येत्या ७ ऑक्टोबर रोजी शरद लाड भाजपमध्ये प्रवेस करणार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात होऊ लागलीय. (Big Political Shock In Sangli: Ncp Mla’s Son Sharad Lad To Join Bjp)

Sangli Politics NCP Mla Son Join BJP
CM Fadnavis: ओला दुष्काळ की शेतकरी कर्जमाफी? मुख्यमंत्री दोन दिवसात मोठी घोषणा करणार

दरम्यान या चर्चांना भाजपच्या नेत्यांनी दुजोरा दिलाय. शरद लाड यांचा प्रवेश झाला तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का असणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकेच नाहीतर शरद लाड यांच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिरवा कंदील दाखवलाय. दाखवल्याची माहिती आहे. त्यामुळे शरद लाड यांचा मुंबईत ७ ऑक्टोबर रोजी पक्षप्रवेश होणार असल्याच निश्चित झालाय.

Sangli Politics NCP Mla Son Join BJP
Ramdas kadam: उद्धव ठाकरे वाघ नव्हे तर लांडगा; मेळाव्यानंतर रामदास कदमांचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल

अरुण लाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असून ते माजी मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे जयंत पाटलांना धक्का देण्यासाठीच भाजपने अरुण लाड यांचा मुलगा शरद लाड यांना गळाला लावल्याची चर्चा सुरूय. हाती आलेल्या माहितीनुसार, दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होत शरद लाड यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते, असं म्हटलं जात आहे.विजयादशमी निमित्ताने संभाजी भिडे यांच्या सांगलीतील दुर्गामाता दौडमध्ये शरद लाड यांनी उपस्थिती लावली होती. त्याचवेळी ते भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झालं होतं, अशी चर्चा सुरूय.

गेल्या काही दिवसांपासून पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी सुरूय. सध्या या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अरुण लाड प्रतिनिधीत्व करतात. या मतदारसंघात भाजपला आपला आमदार हवाय, त्याकारणाने भाजपनं हा डाव खेळत थेट आमदाराच्या पुत्राला आपल्या पक्षात आणण्याचा खटाटोप भाजपकडून सुरूय. शरद लाड भाजपमध्ये प्रवेश करतील तेथील राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com