CM Fadnavis: ओला दुष्काळ की शेतकरी कर्जमाफी? मुख्यमंत्री दोन दिवसात मोठी घोषणा करणार

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री दोन दिवसांत मोठी घोषणा करणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलीय. दरम्यान मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे भरपाईची मागणी तीव्र होतेय.
CM Devendra Fadnavis
Maharashtra CM set to announce big relief package for farmers, loan waiver likely after crop losses due to heavy rains. saamtv
Published On

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी हाती आलीय. दोन दिवसात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदतीची मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे नुकासान झाल्यानं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी केली जातेय. त्यामुळे मुख्यमंत्री कदाचित दोन दिवसात ओला दुष्काळ जाहीर करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर पीक अतिवृष्टीमुळे वाया झालंय. तर नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतजमीन वाहून गेल्या आहेत. त्यामुळे शेतात पुढील पीक कसं घ्यायचं असा प्रश्न बळीराजाला पडलाय. दरम्यान शेतकऱ्यांच्या मदतीसीठी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारनं करावी, अशी मागणी विरोधक आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

CM Devendra Fadnavis
Gondia Heavy Rain : पावसानं घात केला; गोंदियाच्या ५१ गावांमध्ये ४७० हेक्टर क्षेत्र बाधित

सर्व शेतकरी भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत का? - उद्धव ठाकरेंचा सवाल

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारला एकत्र येण्याची विनंती केली होती. मात्र राज्य सरकारकडून मदत केली जात नाहीये. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जातय. त्यामुळे कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालंय. शेतातील उभे पीक अतिवृष्टीत वाहून गेलंय. काही लोकांच्या घरातील संसाराचे सामान वाहून गेलंय आहे. सोयाबीन, कापूस, तूर यासारखी पिके हातातून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावं. दर हेक्टर ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीय.

CM Devendra Fadnavis
Sanjay Raut Vs Ramdas kadam: रामदास कदमांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं'; संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर

शेतकऱ्यांना सरसकट १०० टक्के मदत करा- जरांगे पाटील

दिवाळीच्या आधी सरसकट मदत करावी. ज्यांची शेतं वाहून गेली आहेत, शेतात पाणी आहे, त्यांना ७० हजार मदत करावी. ज्याच्या नदीच्या शेजारची शेत वाहून गेली आहेत अन् पिकपण वाहून गेली, त्यांना ३० हजार ते १ लाखरुपायंची भरपाई द्यावी. ज्यांची जनावरे, धान्य वाहून गेले, घर पडलं, पिके वाहून गेले. तर शेतकरी सांगेल तसा पंचनामा करा, जेवढं वाहून गेले, तेवढी १०० टक्के मदत करा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com