Sanjay Raut Vs Ramdas kadam: रामदास कदमांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं'; संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर

Sanjay Raut Reply Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल धक्कादायक दाव्याबद्दल संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटात एक नवीन राजकीय वाद सुरू झाला आहे.
Sanjay Raut Reply Ramdas Kadam
Sanjay Raut reacts angrily to Ramdas Kadam’s shocking claim on Balasaheb Thackeray’s death during Dussehra Melava.saam tv
Published On
Summary
  • रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत दावा केला.

  • संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया देत कदमांवर हल्लाबोल केला.

  • दसरा मेळाव्यानंतर नवा राजकीय वाद उफाळला.

रामदास कदम यांच्या तोंडात कोणीतरी शेण कोंबलंय. ते आता बाहेर येतंय अशा शब्दात संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केलाय. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला होता.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला. कोणी सह्या केल्या, असा दावा रामदास कदन यांनी केला होता. कदमांच्या दाव्यामुळे नवा वाद उफाळून आलाय. कदमांच्या दाव्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रत्युत्तर दिलं.

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना, बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी", अशी मागणी कदम यांनी केली. कदम यांच्या खळबळजनक दाव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

Sanjay Raut Reply Ramdas Kadam
Uddhav Thackeray: न्याय हक्क मागणे देशद्रोह झालाय; वांगचूक यांच्या अटकेवरून उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल

रामदास कदम यांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलंय. ते आता बाहेर येतंय. बाळासाहेबांना जाऊन आता एक दशक उलटतोय, त्यांनाही आता १०० वर्ष पूर्ण होत आहे. अशावेळी अशी वक्तव्य करणं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान आहे. ही एकप्रकारची बेईमानी आहे. बाळासाहेब ठाकरे आजारी असताना आम्ही त्यांच्या आजारपणात शेवटपर्यंत मातोश्रीवरच होतो", असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut Reply Ramdas Kadam
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले...

रामदास कदम जे बोलत आहेत ते बरोबर - नितेश राणे

रामदास कदम यांनी केलेल्या या विधानावर मंत्री नितेश राणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. रामदास कदम यांचा बाण बरोबर सुटलाय. याचे उत्तर दिले पाहिजे.स्वित्झर्लंडच्या विमानातून कोण येणार होतं, कोण वाट पाहत होतं, कोणत्या कागदपत्रासाठी वाट पाहिली गेली, कोणत्या संपत्तीसाठी? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com