
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.
सोनम वांगचूक यांच्या अटकेवर उद्धव ठाकरेंनी मोदींवर अन्यायाचा आरोप केला.
मोदींच्या पाकिस्तान भेटीचा उल्लेख करून ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली.
सोनम वांगचूक या माणसाने अत्यंत लेह लडाखमध्ये भारतीय जवानांसाठी मोठं काम केलं, पण पंतप्रधान मोदींनी त्यांना तुरुंगात टाकलं. वांगचूक पाकिस्तानात जाऊन आल्याचा आरोप त्यांचावर करण्यात आला. पण मोदी गुपचूप पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाल्ला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय. (Uddhav Thackeray Targets Modi Over Pakistan Visit Remark and Ladakh Activist Arrest)
आज शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला होता. पावसाचे वातावरण आणि सर्वत्र चिखल असूनही लाखो शिवसैनिकांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्या मणिपूर दौऱ्यावरून त्यांच्यावर हल्लाबोल केला.
लेह लडाखला राज्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी सोनम वांगचूक यांनी आंदोलन सुरू केलं. पण मोदींनी त्यांना तुरुंगात टाकलं. नेपाळमध्ये जसं घडलं तसं मोदींनी वागंचूक यांनी जेलमध्ये टाकलं. त्यांनी लेह लडाखमध्ये हाड मोडणाऱ्या थंडीत जवानांसाठी सोलार टेक्लानॉजीवर छावणी बांधून दिली. पाणी मिळावी यासाठी आईस क्यूब आणले.
पण जेव्हा न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई सुरू केली, उपोषण सुरू केलं. पण सरकार पाहायला तयार नाही. त्यांना तुरुंगात टाकत त्यांच्यावर पाकिस्तान गेल्याचा आरोप केला. मग पंतप्रधान मोदी गुपचूप नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात जाऊन केक खाला, त्याला काय म्हणायचं.न्याय हक्क मागणे हा देशद्रोह होत आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.
काही दिवसापूर्वी मोदी मणिपूरमध्ये गेले होते. मणिपूर ३ वर्ष जळत होतं. पण आता कुठे मोदी तेथे गेले. त्यावेळी मोदी तिथे काही तरी तोडगा काढतील. महिलांचं सांत्वन करतील. त्यांचे भाषण आलं हसावं की रडावं असं होतं. मणिपूरच्या नावात मनी आहे. पण मोदींना लोकांच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसतं. मग तिथे जाता कशाला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.