Nashik-Pune Highway ST Bus Accident: नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात बसचा अपघात

Nashik-Pune Highway ST Bus Accident: नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटाजवळ एमएसआरटीसी बसचा ताबा सुटल्याने मोठा अपघात झाला. यात सुमारे ९ ते १० प्रवासी जखमी झाले आहेत.
ST Bus Accident
ST Bus Accidentsaamtv
Published On
Summary
  • नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात एसटी बसचा भीषण अपघात.

  • अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

  • संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात ही दुर्घटना घडलीय.

सचिन बनसोडे, साम प्रतिनिधी

नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या चंदनापुरी घाटात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसला मोठा अपघात झाला आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारात ही दुर्घटना घडलीय. सुदैवाने बस रस्त्याच्या बाजुला असलेल्या दरीत कोसळली नाही. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. या अपघातात ९ ते १० जण जखमी झालेत.

ST Bus Accident
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात; ४८०कोटी रुपये वाटपास मंजुरी, कोणत्या जिल्ह्यांना मिळेल मदत
ST Bus Accident
ST Bus Accidentsaam tv

मिळालेल्या माहितीनुसार चंदनापुर घाटात संगमनेर-साकुर बसचा अपघात झाला आहे. बसला मोठा अपघात झाल्यानं महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. नाशिक पुणे महामार्गावर ही दुर्घटना झाली आहे.

ST Bus Accident
Diwali Special MSRTC Bus : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! दिवाळीसाठी अतिरिक्त ५५ गाड्यांचं नियोजन, जाणून घ्या कुठून कुठे धावणार बसेस
ST Bus Accident
ST Bus Accidentsaam tv

डंपरने बसस्थानकात उभ्या प्रवाशांना चिरडले

धुळ्यात अनियंत्रित झालेल्या डंपरने बसस्थानकात उभ्या असलेल्या नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीरित्या जखमी झालेत. जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथे भीषण अपघाताची घटना घडली.

दरम्यान रेती व मुरुमाने भरलेले डंपर भरधाव वेगाने रस्त्यावरून वाहतात. यामुळे अनेक अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. मुरूम ने भरलेला डंपर भरधाव वेगाने नेला जात असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटलं आणि डंपर खलाणे येथे असलेल्या बसस्थानकात शिरला. यात बसस्थानकाचा शेड देखील पूर्णपणे तुटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com