Pune Police news Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: दुर्देवी! माऊंट एव्हरेस्ट मोहिम फत्ते करणाऱ्या पोलीस कर्मचाराचा मृत्यू; ब्रेन डेड झाल्याने सुरू होते उपचार

Pune Policeman Death Due To Brain Dead: स्वप्निल गरड हे एक उत्तम गिर्यारोहक असून त्यांनी यापूर्वी जगातील अनेक शिखर सर केले आहेत.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Police News: पुणे पोलिस दलातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच माऊंट एव्हरेस्ट सर केलेले पोलिस कर्मचारी स्वप्निल गरुड यांचा उपचारा दरम्यान निधन झाले आहे. स्वप्नील गरड यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांचे ‘ब्रेन डेड’ झाले होते. ज्यावर काठमांडू येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज (७, जून) पावणे चारच्या सुमारास त्यांची प्राण ज्योत मालवली. (Pune Police News)

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वप्नील गरड हे पुणे पोलीस (Pune Police) दलातील आर्थिक गुन्हे शाखेत (EoW Pune) कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट शिखर (Mount Everest) सर करण्यासाठी गेले होते. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काठमांडू येथील रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान त्यांना ब्रेन डेड झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यांच्यावर काठमांडूमधील रुग्णालयात उपचारही सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने संपुर्ण पुणे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

स्वप्निल गरड हे एक उत्तम गिर्यारोहक असून त्यांनी यापूर्वी जगातील अनेक शिखर सर केले आहेत. त्यांनी नेपाळमधील माउंट अमा दबलम (Mount Ama Dablam in Nepal) हे शिखर सर केले होते. हे शिखर सर केल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी तिरंगा ध्वज फडकवला होता.

दरम्यान, ३१ मे रोजी पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले प्रकाश अनंत यादव यांचा देखील मृत्यू झाला होता. त्यामुळे एका पाठोपाठ दुसरा पोलिसाचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT