Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये हत्येचा थरार! भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं, हल्ल्यात आईसुद्धा गंभीर जखमी

Chandrapur Brother Stab Sister Crime News : चंद्रपूरमध्ये संपत्तीच्या वादातून भावाने सख्ख्या बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आईलाही गंभीर दुखापत झाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये हत्येचा थरार!  भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं, हल्ल्यात आईसुद्धा गंभीर जखमी
Chandrapur Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • संपत्तीच्या वादातून भावाने केली बहिणीची हत्या

  • मध्यस्थीला गेलेल्या आईला गंभीर दुखापत

  • पोलिसांची तातडीची कारवाई

  • घटनेनंतर परिसरात खळबळ आणि तपास सुरू

Chandrapur Bhadravati Crime News Marathi संपत्तीच्या वादातून वाद होणं हे काही नवीन नाही. मात्र याचं संपत्तीच्या वादातून एका तरुणाने आपल्या सख्ख्या बहिणीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. भावंडांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या आईला सुद्धा या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा खोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात घडली आहे. आरोपीचे नाव सुरज शंकर भोंडे ( वय २८ ) असून संजीवनी शंकर भोंडे ( वय ३२ ) असे मृत बहिणीचे नाव आहे, तर पुष्पा शंकर भोंडे (वय ५८) असे गंभीररीत्या जखमी झालेल्या आईचे नाव आहे.

Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये हत्येचा थरार!  भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं, हल्ल्यात आईसुद्धा गंभीर जखमी
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, ५ ते ६ जण गंभीर जखमी; नेमकं कारण काय?

गेल्या तीन - चार दिवसांपासून भोंडे कुटुंबीयांमध्ये संपत्तीतून वाद सुरु होते. त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगितले जाते. या वादादरम्यान आरोपी आणि त्याच्या बहिणीमध्ये हाणामारी झाली. हाणामारीत भावाने बहिणीची हत्या केली.

Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये हत्येचा थरार!  भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं, हल्ल्यात आईसुद्धा गंभीर जखमी
Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

या घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी सूरजला अटक केली असून पोलिसांनी वडिलांना देखील ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com