Mumbai Crime News: चर्चगेट घटनेनंतर राज्य सरकार अलर्ट! राज्यातील सर्व शासकीय वसतीगृहांची सुरक्षा तपासण्याचे आदेश

Mumbai News Update: पीडित मुलीला वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर एकटीला का ठेवलं? असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Churchgate Hostel Rape and Murder Case
Churchgate Hostel Rape and Murder Case saam tv
Published On

Churchgate Hostel Rape and Murder Case : चर्चगेट अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. या घटनेनंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व शासकीय वसतीगृहांची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून एका आठवड्यात सर्व शासकीय वसतीगृहांचे ऑडिट केले जाणार आहे. १४ जूनपर्यंत आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार पोलीस चौकशी करणार

मुंबईतील चर्चगेट येथील वसतीगृहात तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात वेगाने तपास सुरू आहे. या प्रकरणात आता पीडितेच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार पोलीस चौकशी करणार आहेत. पीडित मुलीला वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर एकटीला का ठेवलं? असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस या आरोपाच्या अनुषंगाने तपास करणार आहेत.

Churchgate Hostel Rape and Murder Case
Maharashtra Political News: ठाकरेंना घेरण्यासाठी शिंदेंची नवी खेळी; मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राने आखली नवी रणनीती

वस्तीगृहतील 7 ते 8 जणांचे जबाब नोंदवले

या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी वस्तीगृहतील 7 ते 8 जणांचे जबाब नोंदवले आहेत. पीडिता राहत असलेल्या चौथ्या मजल्यावर सीसीटीव्ही आहे, मात्र तो बंद होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. तसेच वसतीगृहातील कित्येक सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याचे देखील तपासात आढळले आहे.

आरोपी वसतीगृहातून कधी बाहेर पडला?

आरोपीने रात्री साडेअकरा ते पहाटे साडेचार दरम्यान हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इमारतीच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजनुसार आरोपी पहाटे पावणेपाच्या वाजण्याच्या सुमारास वसतिगृहाच्या गेटमधून बाहेर पडला आणि पुढच्या 10 ते 12 मिनिटांत त्याने रेल्वेट्रॅकवर झोपून आत्महत्या केली.

Churchgate Hostel Rape and Murder Case
Monsoon 2023 Update: मान्सूनबाबत हवामान विभागाची मोठी अपडेट, 24 ते 48 तासांत केरळमध्ये दाखल होणार

पीडितेच्या खोलीची चावी आरोपीच्या खिशात

आरोपीने पीडितेचा मृतदेह असलेल्या खोलीला बाहेरून कुलूप लावून चावी स्वतःच्या खिशात ठेवूनच आत्महत्या केली असल्याचे तपासातून समोर आले आहे. पोलिसांना आरोपीच्या मृतदेहाच्या खिशात पीडितेच्या खोलीची चावी सापडली आहे. (Breaking News)

इतर मुलीही आरोपीच्या संपर्कात होत्या

हॉस्टेलमधील इतर मुलीही आरोपीच्या संपर्कात होत्या आणि त्याला छोट्या मोठ्या गोष्टी आणण्यासाठी फोन करायच्या हे देखील चौकशीत समोर आलं आहे. आरोपी ओमप्रकाश कनोजिया याची हॉस्टेलचा अधिकृत स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. मात्र वसतिगृहात इस्त्री करून देण्याचेही काम तो करायचा. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com