Nitesh Rane, uddhav thackeray, transgender, shivsena, pune, raigad, mahad saam tv
मुंबई/पुणे

Nitesh Rane News : 'त्या' शब्द प्रयाेगावरुन आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल हाेणार ? पाेलिस, कायदेतज्ञांनी दिली 'ही' माहिती

Nitesh Rane Statement About Transgender : राज्यातील विविध जिल्ह्यात आमदार नितेश राणेंच्या वक्तव्याचा निषेध नाेंदविला गेला.

Siddharth Latkar

ज्ञानेश्वर चाैतमल / सचिन कदम

Nitesh Rane News : आमदार नितेश राणे (mla nitesh rane) यांच्या विधानामुळे तृतीयपंथी (transgender) यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राणेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आज (बुधवार) तृतीयपंथी समुदायाने पुण्यात (pune) रास्ता राेकाे (rasta roko andolan) आंदाेलन केले. आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पुणे पोलिसांनी आंदाेलकांकडे वेळ मागितली आहे. दरम्यान राणेंच्या वक्तव्याचा रायगड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे (uddhav thackeray) गटाच्या शिवसेनेने निषेध नाेंदविला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांनी मागितला वेळ

वंचित आघाडीचे सुजात आंबेडकर म्हणाले तृतीयपंथी समुदायाबाबत राणे यांनी चुकीचा शब्द प्रयाेग केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी तृतीयपंथी समाजातील कार्यकर्त्यांसमवेत आज आंदाेलन छेडले. पुणे पाेलिसांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात वेळ मागितली आहे. काय कारवाई करणार यावर आज संध्याकाळपर्यंत वंचित आणि तृतीयपंथी नागरिकांना कळवलं जाईल असे पाेलिसांनी सांगितले आहे.

याेग्य कार्यवाही न झाल्यास...

पोलिसांनी याेग्य कार्यवाही न केल्यास आम्ही संध्याकाळपर्यंत भूमिका जाहीर करू असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.

पहिल्यांदाच अशी केस

आमदार नितेश राणेंच्या हिजडा या शब्द प्रयाेगावरुन कायदेतज्ज्ञ असीम सरोदे (asim sarode) म्हणाले आज पहिल्यांदाच अशी केस पोलिसांकडे आली आहे. हिजडा हा शब्द वापरु नये. मात्र पोलिसांनी या संदर्भात जिल्हा सरकारी वकिलांकडे सल्ला मागितला आहे. तृतीयपंथीयांना समान अधिकार दिले जातात मात्र अपमान करण्यात आला आहे. ही केस मानवी हक्क न्यायालयात ही केली जाऊ शकते. मात्र आज जर कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयातही जाण्याची शक्यता आहे.

त्यांच्या संस्कारांचं दर्शन

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाले विरोधकांवर सहज गुन्हे दाखल करतात, पण सत्य घटना असेल तर तपासायला वेळ मागतात. खरं तर भाषेचा स्तर घसरला आहे. निलेश, नितेश राणेंच अभिनंदन केलं पाहिजे. ते त्यांच्या संस्कारांचं दर्शन घडवताहेत. पाेलिसांनी नितेश राणेंवर गुन्हा दाखल केला पाहिजे असेही अंधारेंनी नमूद केले.

महाडला राणेंचा निषेध

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये आमदार नितेश राणे यांचा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निषेध नाेंदविला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द काढल्या प्रकरणी शिवसैनिकांनी निषेध नाेंदविला. महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राणेंच्या विराेधात घाेषणा दिल्या. आमदार नितेश राणे यांच्या फोटोवर फुली मारून आणि फोटो पायदळी तुडवुन कार्यकर्त्यांनी नाेेंदवला निषेध.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT