Buldhana News : बुलढाणा जिल्हा परिषदेच्या (buldhana zilla parishad) आवारात बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी मुख्याधिकारी भाग्यश्री विसपुते (bhagyashree vispute) यांनी नवा प्रयोग केला आहे. जी वाहनं बेशिस्तरित्या लावली जात आहेत त्या वाहनांची झेडपी कर्मचाऱ्यांकडून टायरमधली हवा सोडली जात आहे. (Maharashtra News)
बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जिल्हाभरातून नागरिक त्याचबरोबर तालुकास्तरावरील अधिकारी, कर्मचारी ही आपली कार्यालयीन कामे करण्यासाठी येत असतात. मात्र कार्यालयीन पार्किंगमध्ये वाहने उभी व्यवस्थित उभी करत नाहीत.
या बेशिस्तपणामुळे अनेक वेळा जिल्हा परिषद कार्यालयाच्या (zilla parishad) आवारात वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरताे. दरम्यान बेशिस्त लावलेल्या वाहनांवर एक वेगळ्या पद्धतीने कारवाईची शक्कल आता लढवण्यात आली आहे.
जिल्हा परिषद कार्यालय परिसरात महात्मा गांधी यांचा पुतळा आहे. याच पुतळ्याच्या अवतीभोवती वाहने उभी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांना वारंवार सांगूनही त्या ठिकाणी वाहने लावणे बंद होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी संबंधित वाहनातील हवा सोडून देण्याचे आदेश दिले.
त्यानूसार कर्मचारी कार्यवाही करीत आहेत. या नव्या नियमामुळे आता तरी बेशिस्त नागरिकांना शिस्त लागेल हीच अपेक्षा आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.