Pune Police Expose 19-Year-Old’s Fake Kidnapping Plot for ₹5 Lakh AI Image
मुंबई/पुणे

Pune : पैशांसाठी ढसाढसा रडला, उत्तर प्रदेशच्या तरुणाने पुण्यात स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला

Pune News : पाच लाख रुपये मिळवण्यासाठी १९ वर्षीय तरुणाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला. कुटुंबीयांना रडतानाचा व्हिडिओ पाठवला; पुणे पोलिसांनी खडकीतील लॉजमधून त्याचा शोध घेतला.

Akshay Badve

  • पैशांसाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव

  • कुटुंबीयांचा विश्वास बसावा म्हणून खोटा व्हिडिओ बनवला

  • पोलिसांनी सापळा रचून उघडकीस आणला डाव

  • लॉजमध्ये तरुण पोलिसांच्या हाती लागला

पैशांच्या हव्यासापोटी माणसे कुठल्या थराला जाऊ शकतात याचे नुकतेच एक उदाहरण पुण्यातून समोर आलं आहे. मोठ्या भावाकडून पैसे हवे होते म्हणून एका १९ वर्षीय उत्तर प्रदेशच्या तरुणाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला. इतकचं काय तर उत्तर प्रदेशमध्ये राहत असलेल्या कुटुंबियांना खरं वाटण्यासाठी ढसाढसा रडल्याचे व्हिडिओ सुद्धा पाठवले. संबंधित तरुण हा पुण्यात असल्याचे समजताच पुणे पोलिसांनी त्याचा ठाव ठिकाणा शोधला तर तो एका लॉज मध्ये बसून हा सगळा प्लॅन करत असल्याचं निष्पन्न झालं.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश गौरीशंकर (वय १९) असे या तरुणाचे नाव आहे. गौरीशंकर हा उत्तर प्रदेश मधील बांदा जिल्ह्यातील बेबेरू तालुक्यात असणाऱ्या जाललपूर गावचा रहिवासी आहे. काही कारणास्तव तो पुण्यात आला होता. पुण्यात आल्यानंतर त्याच्याकडे काही काम धंदा नसल्याने त्याला पैश्यांची गरज होती. अनेक वेळा खर्चाचे पैसे कमी पडत असल्याने त्याला आर्थिक अडचणी येत असे. या अडचणी वर मात करण्यासाठी त्याने एक शक्कल लढवली.

एके दिवशी त्याने त्याच्या उत्तर प्रदेश मध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना आणि भावाला आपण "किडनॅप" झालो आहे असं सांगितलं. विश्वास बसावा म्हणून त्याने एक व्हिडिओ देखील कुटुंबियांना पाठवला ज्यामध्ये गौरीशंकर ढसाढसा रडतो आहे असं दिसत होतं. तसेच सुखरूप सुटका करायची असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील असं देखील सांगितलं होतं. आपल्या मुलाचे अपहरण झालं ही माहिती स्वतः मुलगा देतोय. यामुळे त्याचे कुटुंबीय घाबरून गेलं आणि त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठलं. शाहजहांपुर पोलिसांत कुटुंबीयांनी तक्रार देताच उत्तर प्रदेश पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क केला.

उत्तर प्रदेश येथील एका व्यक्तीचे पुण्यात अपहरण झाले असून, अपहरण करणारे पाच लाख रुपयांची मागणी करत आहेत,.अशी माहिती शाहजहांपुर पोलिसांनी देताच पुणे पोलिस दल "अलर्ट मोड" मध्ये गेले आणि शोध सुरू झाला अपहरणकर्त्यांचा. १७ ऑगस्ट म्हणजेच आज मध्यरात्रीपासून पहाटे पर्यंत पुणे शहरातील विविध ठिकाणच्या पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी संबंधित तरुणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. "नाईट राऊंड" ला असणारे पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त आणि काही पोलीस ठाण्याचे अधिकारी हे सर्व जणं त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते.

अपहरण झालेल्या व्यक्तीचा मोबाईल नंबर उत्तर प्रदेश पोलिसांनी पुणे पोलिसांना दिल्यामुळे बंडगार्डन पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याचा क्रमांक, "ट्रॅक" करायला सुरुवात केली. या दरम्यान, संबंधित तरुण हा पुण्यातील खडकी भागात असल्याचे समजताच बंडगार्डन पोलिसांनी त्यांचा मोर्चा तिकडे वळवला. रात्रीच्या वेळी गस्त घालणारे अधिकारी व मार्शल तसेच बंडगार्डन पोलिस यांनी खडकी भागातील क्राउन प्लाझा लॉजिंग याठिकाणी धाव घेतली.

त्या ठिकाणी पोहचताच तिथे कुठले ही अपहरणकर्ते नसून स्वतः गौरीशंकर असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्याच्याकडे चौकशी केली असता आपणच आपल्या भावाला आपले अपहरण झाल्याचे व्हिडिओ पाठवत असल्याचं कबुल केलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतच त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचे उघडकीस आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चिपळुणातील गांधारेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी

नागपंचमीचा उपवास भावासाठी का करायचा? कारण तुम्हाला माहिती असायला पाहिजे

Gen Alpha Club : रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता? भिवंडीच्या मुलींचा संतप्त सवाल; व्हिडिओ तुफान व्हायरल

Heart Attack : सकाळी केलेली 'ही' छोटी चूक वाढवते हार्ट अटॅकचा धोका, वेळीच व्हा सावध

Pune Police : पुण्यात खाकीला डाग! पोलीस स्टेशनमध्येच महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे; हवालदारावर तडकाफडकी निलंबित

SCROLL FOR NEXT