Pune Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, १५ लाख लिटर विषारी दारू तयार करण्याचा कट उधळला

Pune Police Bust Massive Illegal Liquor Plot: पुण्यातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. १५ लाख लिटर विषारी दारू तयार करण्यापूर्वी कट उधळला.

Priya More
  • पुण्यातील कुरकुंभमध्ये विषारी दारू कारखान्यावर कारवाई

  • १५ लाख लिटर विषारी दारू तयार करण्याचा कट उधळला

  • पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. तब्बल १५ लाख लिटर विषारी दारुची निर्मीती करण्याचा कट उधळवून लावला. विषारी दारु निर्मितीसाठी वापरले जाणारे हजारो लिटरचे केमिकल जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या धडक कारवाईची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. ३४२० किलो कोरल हायड्रेट आणि ते करण्यासाठी लागणारे ५८००लिटर रॉ- केमिकल जप्त करण्यात आले. पुण्यातील कुरकुंभ येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील एका कारखान्यातून ३४२० किलो वजनाचा पिवळया रंगाचा स्फटीक सदृश्य पदार्थ तसेच ते तयार करण्याकरीता लागणारे ५८०० लिटर रॉ केमिकल मिळून आले होते. किशोर दत्तात्रय सुर्वे, शैलेश विठल ठाकुर, नबी सरवर जमीर सिध्दीकी, आदेश विठठल पाचांगणे हे अवैध फॅक्ट्री चालवित असल्याचे तपासातून आढळून आलेले आहे. संबंधित कारखाना सुर्वेच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले असून तिथे मिळून आलेले केमिकल हे शैलेश ठाकूर यानेच बनविले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या कारवाईमध्ये एकूण ३४२० किलो वजनाचा फिकट पिवळ्या पांढऱ्या रंगाचे स्फटीकासारखा संशयीत पदार्थ तसेच ते तयार करण्याकरीता लागणारे ५८०० लिटर रॉ केमिकल मिळून आले आहे. या ठिकाणी मेफेड्रॉन या अंमली पदार्थाचे उत्पादन करण्याकरीता आवश्यक असलेले सेट्रीफ्युगल मशीन तसेच GLR मशीन मिळून आलेले आहेत.

संशयित पदार्थाची न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणेतर्फे तपासणी करून घेण्यात आली असून त्यांचकडून प्राप्त अहवालानुसार या संशयीत पदार्थामध्ये प्रतिबंधीत करण्यात आलेले कोरल हायड्रेट हे केमिकल असल्याचे आढळून आलेले आहे. या कोरल हायड्रेट पासून विषारी दारुची निर्मीती केली जाते. ३४२० किलो रसायनापासून सुमारे १५ लाख लिटर विषारी दारुची निर्मीती केली जाऊ शकते. या ठिकाणी जप्त करण्यात आलेले सेट्रीफ्युगल मशीन तसेच GLR मशीन यांची किंमत अंदाजे १ कोटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपूर दौऱ्यावर

15 दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर सुनेत्रा पवार...; आमदाराच्या दाव्याने खळबळ

Early Signs of Hypertension: पावसाळ्यात हाय बीपीची सुरुवातीची ही ७ लक्षणं दिसून येतात

Gender Guidebook : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! 'कॉल गर्ल’ सारखे शब्द वापरण्यावर बंदी, पोलीस आणि न्यायालयाची भाषा बदलणार

Matar Mushroom Recipe : हॉटेलसारखी चमचमीत मटर मशरूम भाजी आता घरच्या घरी, जाणून घ्या सर्वात सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT