Pune News: बांधकाम व्यावसायिक आत्महत्या प्रकरण; शिंदे गटातील बडा नेता आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

Pune Contractor Death Case: पुण्यातील कंत्राटदार खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आलीय. आत्महत्येच्या चिठ्ठीत आर्थिक फसवणुकीचा उल्लेख केलाय. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Pune Contractor Death Case
Police investigation intensifies in the Khalil Sheikh suicide case as allegations of financial fraud and abetment to suicide leadsaam tv
Published On
Summary
  • पुण्यातील कंत्राटदार खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली.

  • आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • सुसाईड नोटमध्ये आर्थिक फसवणूकचा आरोप

पैशाच्या व्यवहाराला वैतागून तसेच थकीत पैसे परत न मिळाल्यामुळे पुण्यातील कॉन्ट्रॅक्टर खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. या आत्महत्या प्रकरणात शिंदे गट शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीचं नाव आलंय. याप्रकरणात रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Pune Contractor Death Case
आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आत्महत्या करताना खलील शेख यांनी सुसाईड नोटमध्ये पुण्यातल्या अनेक नेत्यांचे नाव लिहिले आहे. रवींद्र धंगेकर त्यांच्या पत्नी आणि इतर काही जणांनी माझी आर्थिक फसवणूक केली असा आरोप खलील शेख यांनी आपल्या सुसाईडमोडमध्ये केलाय.

Pune Contractor Death Case
Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

पैशाच्या व्यवहाराला वैतागून तसेच थकीत पैसे परत न मिळाल्यामुळे पुण्यातील कॉन्ट्रॅक्टर खलील शेख यांनी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शेख यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केले. यामध्ये त्यांनी पैश्याची थकीत आपल्याला मिळत नसल्याचे सांगत आपण जीवन संपवत आहोत असं सांगितलं. दरम्यान, आत्महत्या केलेल्या घरातून सुसाईड नोट पोलिसांना मिळून आल्या आहेत. ज्यामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांचे नाव असून त्यांच्याकडून थकित रक्कम २० लाख रुपये बाकी असल्याचं लिहिलं आहे.

यातील एका कागदावर उत्कर्ष असोसिएट्स मधून २० लाख रुपये थकीत आहेत, या प्रकरणात ३ टक्क्याने व्याज भरत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे तसेच "रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी" असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी सह या पत्रात माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांच्या पत्नीचे सुद्धा नाव लिहिलंय.

या सगळ्या प्रकरणावर रवींद्र धंगेकर यांनी खुलासा केला असून, "उत्कर्ष असोसिएट्स या मध्ये मी, बाळा शेडगे, रघु गवडा होतो. या प्रकल्पाला वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आणि याचे काम थांबले. या प्रकल्पामुळे आम्हाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले त्यात हा ठेकेदार होता आणि त्याने आत्महत्या केली पण १०, २० लाख रुपयांसाठी तो आत्महत्या करेल असं वाटत नाही कारण कोणीतरी व्हिडिओ केलाय, कोणीतरी पत्र लिहिलं आहे यात राजकीय हस्तक्षेप आहे. आम्ही पोलिसांकडे बाबी मांडू," असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com