

अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांना लगावला अप्रत्यक्ष टोला
आता शिवसेनेची एकनाथ शिंदेंचीच असल्याचा अमित शहा यांचा दावा
अमित शहा यांनी कोल्हापुरातून ठाकरेंवर साधला निशाणा
रणजीत माजगावकर, साम टीव्ही
भारतीय जनता पक्षाकडून कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भाषणाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांची नावे घेताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. अमित शहा म्हणाले की, पूर्वी एकनाथ शिंदे यांचे नाव घेताना त्यांच्या पाठीमागे ‘शिवसेना शिंदे गट’ असे म्हणावे लागत होते. मात्र आता कोणताही गट उरलेला नसून फक्त एकच शिवसेना राहिलेली आहे. या वक्तव्यातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
अमित शहा यांच्या भाषणातील मुद्दे
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात कॉरिडॉर निर्मिती करण्यात येत आहे. पंधराशे करोड रुपयांमध्ये हा कॉरिडॉर तयार होणार आहे. हे मंदिर पुन्हा एकदा ऊर्जेतून तयार होणार आहे. मंदिर हे जगभरातील भक्तांसाठी सज्ज असणार आहे. AI कॅमेरे, एलईडी , आउटडोर गॅलरी, लाईस्ट अँड साऊंड शो, सुपर गॅलरी, अन्नछत्र , पोलीस चौकी आणि हे रिटकार्ड समवेत हे मंदिर तयार होणार आहे. सहा महिन्यात हे सर्व कामे पूर्ण होणार आहे. देशभरातील विकासाचे सर्व कामे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत.
राम मंदिर पूर्ण होईल की नाही, अशी आधी शंका होती. मात्र भाजपने ते करून दाखवले. काशिधामसह इतर देशातील महत्त्वाच्या मंदिरांचे कॉरिडोर झाले, आता अंबाबाई मंदिराचे देखील कॉरिडॉर होत आहे. सर्व ज्योतिर्लिंग, सर्व शक्तीपीठ महाराष्ट्रात पुनर्निर्मित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात जास्त कालावधीसाठी पंतप्रधान होण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. बारा वर्षे सलग विकास आणि भारताचा सन्मानासाठी त्यांनी काम केले.
बारा वर्षात सोमनाथपासून गंगासागरपर्यंत आणि संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टी आणि एनडीएने कामे केली. सर्वांना चिंता होती की पश्चिम बंगालचं काय होणार? पण या निवडणुकीत बंगालच्या निवडणुकीत विजय मिळवला. पश्चिम बंगालच्या जनतेचे ऋण भाजपावर आणि नरेंद्र मोदींवर आहे. पश्चिम बंगालच्या सीमेवरून घुसखोरी बंद होणार नाही, देशात देखील घुसखोरी होऊ देणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.