मोदी सरकारने मागील 10 वर्षांत किती लोकांना गरिबीतून बाहेर काढलं? CM देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारी सांगितली

cm devendra fadnavis News : मोदी सरकारने मागील १० वर्षांत कोट्यवधी जनतेला गरिबीतून बाहेर काढलं. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी देखील दिली.
devendra fadnavis
devendra fadnavis newsSaam tv
Published On
Summary

मोदी सरकारने पूर्ण केला १२ वर्षांचा काळ

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य

मोदी सरकारने १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मोदी सरकारच्या १२ वर्षपूर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं. देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवलं जाऊ शकते, हे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याने दाखवून दिलंय. फक्त अनुदान घेणे ही वृत्ती न बाळगली नाही. तर देशाला जगात स्वाभिमानाने उभा असलेला भारत देश बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. मेक इन इंडिया ही चळवळ राबवून मेक फॉर वर्ल्ड च्या दिशेने देशाची वाटचाल सुरू करण्यामागे मोलाचे योगदान दिलंय, असं गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबईत बोलताना त्यांनी सरकारने किती जणांना गरिबीतून बाहेर काढलं, त्याची आकडेवारी देखील दिली.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 12 वर्षांत खूप मोठं कार्य केलं आहे. एका पुस्तकात त्यांचं कार्य मांडणे खूप कठीण काम आहे. तळागाळातील शेवटच्या माणसाला सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी मोदी यांनी सतत प्रयत्न केलेत. हर घर शौचालय, उज्वला गॅस योजना यांसारख्या योजना राबवल्या आहेत.

'मोदी सरकारच्या अनुदानावर जनतेला न ठेवता गरीब केंद्रित अजेंडा त्यांनी राबवला. सरकारला मागील 10 वर्षांत 25 कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढलं. भारताचा GDP 2013-14 मध्ये 103 लाख कोटी होता, तो 2025-26 मध्ये 357 लाख कोटींपर्यंत म्हणजेच तिप्पट वाढवलाय. राज्याचा GDP 2013-14 मध्ये 13 लाख कोटी इतका होता, तो 2025-26 पर्यंत 54 लाख कोटी इतका वाढवलाय', अशी त्यांनी आकडेवारी दिली.

devendra fadnavis
राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; नवीन मंत्र्यांना खातेवाटप मिळताच राजकारण तापलं

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या बारा वर्षांत भारताने केवळ विकास केला नाही, तर जगात एका नव्या राष्ट्रशक्तीचा आदर्श उभा केलाय. भारतात आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करतंय. उद्योगशील आणि नारीशक्तीला केंद्रस्थानी ठेवणारा समर्थ राष्ट्र म्हणून जगभरात ओळखला जात आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. नारीशक्तीला केंद्रस्थानी ठेवणारा समर्थ राष्ट्र म्हणून जगभरात ओळखला जातोय, असेही त्यांनी सांगितले.

devendra fadnavis
Kalyan Politics: दुर्गाडी मंदिर प्रवेश बंदीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले; ठाकरे गटाचा भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल

'मोदी सरकारने शेतकरी, कामगार, गरीब, वंचित आणि उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी व्यवस्था निर्माण केली. पारदर्शक शासनपद्धतीमुळे सरकारी योजनांचा लाभ थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलाय. देशातील गरीबांच्या घरात उजेड, महिलांच्या आयुष्यात सन्मान, युवकांच्या हातात संधी आणि सामान्य नागरिकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झालाय, असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com