Mira Road Accident: मुंबईमधील बांधकाम साईटवर भीषण अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, अनेक वाहनांचा चुराडा

Mira Road Crane Falls : मीरारोड येथील 'जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्स'मध्ये बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मोठा अपघात झालाय. इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून क्रेन कोसळल्याने एक मोठा अपघात झाला. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले.
Mira Road Crane Falls :
crane collapsed from the 11th floor of an under-construction building at Mira Road's JP North Complex,
Published On
Summary
  • मिरारोडच्या जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्समध्ये बांधकाम साईटवर मोठी दुर्घटना घडली.

  • ११ व्या मजल्यावरील क्रेन अचानक कोसळून खाली उभ्या वाहनांवर पडली.

  • या अपघातात अनेक वाहनांचा चुराडा झाला.

मनोज तांबे, साम प्रतिनिधी

मिरारोड येथील जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी सायंकाळी एक गंभीर दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या आरईआरएस इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील क्रेन कोसळली. त्यामुळे खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर पडली असून वाहनांचा चुराडा झालाय. या दुर्घटनेत एक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालीय.

Mira Road Crane Falls :
Mumbai : तरुणाचे केस कापून अर्धनग्न अवस्थेत काढली धिंड; मुंबईतील धक्कादायक प्रकार

या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या दुर्घटनेत चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्सच्या आवारात RERS या इमारतीचे बांधकाम सुरूय. नेहमीप्रमाणे आज सायंकाळीही बांधकामस्थळी कामगारांची रेलचेल होती. ११व्या मजल्यावर साहित्याची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी मोठी क्रेन बसवण्यात आली होती. अचानक या क्रेनमध्ये बिघड झाल्यानंतर ती खाली कोसळली. इमारतीखाली असलेल्या वाहनांवर ही क्रेन पडली. क्रेनचा आकार आणि वजन प्रचंड असल्याने खाली उभ्या असलेल्या अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा चुराडा झाला.

Mira Road Crane Falls :
Mumbai : विरारमध्ये भयंकर घडलं, अर्नाळा समुद्रात ४ मुलं वाहून गेली

एक गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल

या क्रेनच्या ढिगाऱ्याखाली एक व्यक्ती अडकली होती. परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ धावपळ करत बचावकार्य करण्यात आले. दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर जेपी नॉर्थ कॉम्प्लेक्स आणि मिरा रोड परिसरातील स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com