Mumbai- Bengaluru Highway Traffic  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai- Bengaluru Highway: पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल, भूमकर चौक ते कंट्रोल चौकदरम्यान जड वाहनांना बंदी

Pune Traffic: पुण्यातील बंगळुरू महामार्गावर वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरातील भूमकर चौक भुयारी मार्ग ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौक दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातल्या वाहतूक नियमांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरातील भूमकर चौक भुयारी मार्ग ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौक दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुणे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी हे आदेश दिले आहेत. या भागातील गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे.

बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे, धायरी परिसराचा पुणे महापालिकेत समावेश झाला आहे. या भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. तसेच खासगी कंपन्याही आहेत. विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने या परिसरातून जातात. मुंबई- बंगळुरू बाह्यवळण परिसरातील अनेक इमारती आहेत. भागातील वाहतूक, वाढती लोकसंख्या, तसेच अपघातांचे प्रमाण विचारात घेऊन भूमकर चौकातील भुयारी मार्ग ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौकदरम्यान जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत.

सिंहगड रस्त्यावरील मॅकडोनाल्डस उपाहारगृहसमोर दोन्ही बाजूस ५० मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालय, येरवडा, गोल्फ क्लब रस्ता येथे लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन देखील उपायुक्तांनी दिले आहे.

दरम्यान, पुण्यातील वाहतुकीबाबत अजित पवार यांनी सांगितले की, 'लोकांनी वाहतूक शिस्त पाळले पाहिजे पाच- एक हजार रुपये दंड करण्याचा विचार, प्राथमिक चर्चा सुरू आहेत गडकरींची मानसिकता ते आहे देशाचं काम बघत आहे ते, टोल ट्राफिक गर्दी हे टाळण्यासाठी बरेचसे टोल काढलेले आहेत. उड्डाणपूल किंवा इतर काय करता येईल का याची पण चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT