
Working Women Friendly Cities : देशातील नोकरदार महिलांसाठी सर्वोत्कृष्ट असणाऱ्या शहरांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. मनुष्यबळ सल्लागार क्षेत्रातील अवतार ग्रुपने सर्वेक्षण करुन ही यादी तयार केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन महानगरांचा समावेश आहे. काम करणाऱ्या महिलांसाठी उत्तम वातावरण असणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये बंगळुरु पहिल्या स्थानावर आहे.
अवतार समूहाच्या या सर्वेक्षणात विविध पार्श्वभूमीतील १,६७२ महिलांनी सहभाग घेतला होता. यात ६० शहरांचे मूल्यांकन करण्यात आले. सार्वजनिक संस्थांची कार्यक्षमता, अत्यावश्यक सेवांची उपलब्धता, सामाजित सर्वसमावेशकता आणि महिलांसाठी शाश्वत राहणीमान यांसारख्या अनेक निकषांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले. फेब्रुवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, जागतिक बँक, गुन्ह्यांच्या नोंदी आणि नियमित श्रमशक्ती सर्वेक्षणांस अनेक डेटा स्त्रोतांचा वापर करुन अवतार समूहाने ही यादी तयार करण्यात आली आहे. विविध शहरांमधील नोकरदार महिलांचा जीवनाचा अनुभव कसा आहे हे जाणण्यासाठी हे सर्वेक्षण केले गेले आहे. अवतार समूहाच्या संस्थापिका डॉ. सौंदर्या राजेश यांनी या संदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या, महिलांची प्रगती व्हावी यासाठी शहरांची मूलभूत तत्त्वे आणि सांस्कृतिक संरचना समजून घेणे आवश्यक आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी भारतीय महिला व्यावसायिकांनी पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी होणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.