Koyata Gang Pune : पुण्यातील कुख्यात कोयता गँगचे बीड कनेक्शन; पोलिसांच्या जाळ्यात म्होरक्या अडकला

pune Koyata Gang beed news : कुख्यात कोयता गँगचे बीड कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांच्या हाती थेट म्होरक्याच जाळ्यात अडकला. पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
Koyata Gang News
Koyata Gang Pune Saam tv
Published On

बीड : पुण्यात गेल्या काही वर्षांपासून कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. कोयता गँगमुळे नागरिक दहशतीत आहेत. कोयता गँगमुळे लोकांमध्ये एक भीती पसरली आहे. कोयता गँगच्या वाढत्या गुन्ह्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढलं आहे. याचदरम्यान, पोलिसांनी कोयता गँगवर मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गँगच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईनंतर कोयता गँगचं बीड कनेक्शन समोर आलं आहे.

Koyata Gang News
Pune Crime News: शरद मोहोळच्या हत्येचा बदला घ्यायला आले आणि जेलमध्ये गेले; पुणे पोलिसांनी उधळला गँगवॉरचा कट

पुण्यातील कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या पोलिसांच्या कारवाईत कोयता गँगचे बीड कनेक्शन समोर आलं आहे. या गॅंगचा मुख्य आरोपी गोरख सातपुते याला त्याच्या साथीदारासह बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. बीडच्या गेवराई शहरातील म्हाडा कॉलनी भागात असलेल्या एका रिक्षामध्ये, दोघा जणांकडे तलवार आणि कोयता असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला त्या ठिकाणी सापळा लावत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Koyata Gang News
Crime News : २ दिवसांपूर्वी हत्या, रील्स बघून गुंता सुटला; एक पुरावा अन् पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले!

पोलिसांचं हे पथक त्या ठिकाणी दाखल झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना पकडले असता यामध्ये गोरख सातपुते, तात्याराव उर्फ वैभव विजय पहाडे हे दोघे आढळून आले. त्यांच्या ताब्यातून कोयता, तलवार, चाकू आणि रिक्षा असा मुद्देमाल आढळून आला आहे. तर या दोघांवरही गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी पुढील तपासासाठी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

Koyata Gang News
Crime News: पिंकीला कुणी मारलं? हत्येनंतर ६ महिने फ्रीजमध्ये ठेवलं, भयंकर घटनेचं रहस्य उलगडलं

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोयता गँगने पुण्यात विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकाने आणि वाहने फोडली होती. काही नागरिकांवर हल्ला चढवण्यात आला आहे. यातील एक गुन्हेगाराला लोकांनी पकडून चोप दिला होता. त्यानंतर या गुन्हेगाराला पोलिसांचं स्वाधीन केलं होतं. पुण्यातील वाढत्या कोयत्या गँगच्या गुन्हेगारी कृत्यामुळे पुणेकर चिंता व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com