Crime News: पिंकीला कुणी मारलं? हत्येनंतर ६ महिने फ्रीजमध्ये ठेवलं, भयंकर घटनेचं रहस्य उलगडलं

Crime News: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आणखीन एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका महिलेचा फ्रिजमध्ये मृतगदेह आढळल्याने खळबळ माजली होती.
crime news
crime newsSaam Tv News
Published On

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आणखीन एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका महिलेचा फ्रिजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. एका भाडेकरूला अचानक घरातील दुसऱ्या खोलीतून उग्र वास येऊ लागला होता. त्यानं तातडीने ही माहिती घरमालकाला दिली. घरमालकाने माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या तपासात ६ महिन्यांपूर्वी राहणार्‍या संजय पाटीदार यानेच खोलीत ठेवलेल्या फ्रिजमध्ये मृतदेह आढळला. अधिक तपास केला असता, संजय पाटीदार यानेच आपल्या प्रेयसीची हत्या करून मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्याची माहिती आहे.

पिंकी उर्फ प्रतिभा प्रजापती असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणी संजय पाटीदार याला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. उद्योगपती धीरेंद्र श्रीवास्तव यांचे देबास येथील वृंदावन धाम येथे दोन मजली घर आहे. ते सहा महिन्यांपासून दुबईत स्थायित आहेत. या घरात आधी संजय पाटीदार भाडेकरू म्हणून राहत होता.

crime news
Indian Railways: विनातिकीट प्रवास करण्याची चूक पडेल महागात; टीटीई प्रवाशाला किती दंड आकारतो?

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी बलवीर राजपूत याने तळमजला भाड्याने घेतला होता. परंतू, जुन्या भाडेकरूने कुलूप लावलेल्या दोन खोल्या त्याला वापरता आल्या नाहीत. पाटीगार याने जूनमध्ये खोली रिकामी केली होती. मात्र, त्याने फ्रिजसह काही वस्तू खोलीमध्ये ठेवल्या होत्या. काही दिवसांमध्ये वस्तू घेऊन जाईन असं पाटीदार म्हणाला होता. कारण त्या खोलीची बलवीरला गरज होती.

मात्र, शुक्रवारी दुसऱ्या खोलीतून उग्र वास येऊ लागला होता. बलवीर या भाडेकरूने याची माहिती घरमालकाला दिली. घरमालकाने पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा दुसऱ्या खोलीतील फ्रिजमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ज्यामुळे परिसरातील नागरीक भयभीत झाले.

crime news
Robin Uthappa: सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात; रॉबिन उथप्पाच्या दाव्याने क्रीडाविश्वात खळबळ

बलवीर हा भाडेकरू राहण्यापूर्वी संजय पाटीदार नावाचा भाडेकरू राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दिशेने तपास केले असता संजय पाटीदार यानेच प्रेयसीची हत्या करून फ्रिजमध्ये ठेवल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. संजय हा विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. पिंकीसोबत तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गेले ५ वर्ष राहत असल्याची माहिती उघड झाली. याप्रकरणी पोलिसांनी संजय पाटीदार याला बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com