Robin Uthappa: सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात; रॉबिन उथप्पाच्या दाव्याने क्रीडाविश्वात खळबळ

Robin Uthappa News: रॉबिन उथप्पाने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यात संवाद साधताना संपूर्ण जगात कोणत्याही खेळात सर्वाधिक आत्महत्या होत असतील तर ते क्रिकेट आहे, असं म्हटलं आहे.
Robin News
Robin NewsSaam Tv News
Published On

टीम इंडियाचा फलंदाज रॉबिन उथप्पा सध्या त्याच्या एका विधानामुळे प्रचंड चर्चेत आहे. रॉबिन उथप्पा यानं एक खळबळजनक दावा केला आहे. संपूर्ण जगात कोणत्याही खेळात सर्वाधिक आत्महत्या होत असतील तर ते क्रिकेट आहे. क्रिकेटरवर इतका दबाव असतो की त्याची मानसिक स्थिती बिघडते. तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो. हे खळबळजनक वक्तव्य रॉबिन उथप्पा यानं एका मुलाखतीत केला असून, याची चर्चा सध्या सोशल मीडियात होत आहे.

रॉबिन उथप्पाचा मोठा दावा म्हणाला..

रॉबिन उथप्पाने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यात संवाद साधताना त्यानं एक खळबळजनक दावा केला आहे. 'खूप लोकांना माहित आहे की, सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात. हे केवळ खेळाडूंपूरते मर्यादीत नाही.तर, प्लेयर्स, अंपायर्स, ब्रॉडकास्टर्स यांच्यासाठी देखील आहे. डिप्रेशनमुळे सर्वाधिक आत्महत्या या खेळाशी निगडीत होतात.

क्रिकेट हे टीम गेम असून, वैयक्तिक खेळ देखील आहे. सामन्यादरम्यान आपण आपल्या ओपन बॅट्समॅनसोबत खेळत असताना एक मनात भीती असते. बेंचवर तिसरा ओपनर देखील आहे. त्याला देखील खेळायची इच्छा असते. तो आपली जागा घेऊ शकतो. करियरचे १०-१५वर्ष असेच विचारातील काळोखात जाते.'

Robin News
Shocking Video: आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, नंतर लिंग बदलतात; ट्रान्सजेंडर टोळीची दहशत, पाहा धक्कादायक VIDEO

'मला माझीच लाज वाटत होती'

रॉबिन उथप्पा पुढे म्हणाला, २०११ साली मला स्वत:ची लाज वाटत होती. एक व्यक्ती म्हणून मला स्वत:ची लाज वाटत होती. अलिकडेच ग्राहम थोर्पन याने आत्महत्या केली. भारताचा पूर्व क्रिकेटपटू डेव्हिड जॉनसनने देखील आत्महत्या केली होती. मी सुद्धा नैराश्याच्या अंधारात गुरफटलो होतो. तो वाईट प्रवास होता. आपण दुसऱ्यांवर भार बनल्यासारखी भावना मनात येते. आपला काहीच कशातच उपयोग होणार नाही, आपण बिनकामाचे आहोत अशी भावना मनामध्ये येते.' असं रॉबिन उथप्पा म्हणाला.

डिप्रेशन किती घातक असते, आणि त्यामुळे आपल्या मनात आत्महत्येची भावना मनामध्ये कशी येते, हे रॉबिन उथप्पाने मुलाखतीत स्पष्ट केलं.

Robin News
Minor Girls Escape: खिडकीच्या जाळ्या तोडून ८ मुलींनी ठोकली धूम, शासकीय निरीक्षणगृहातील मुली पळाल्या

दरम्यान डिसेंबर महिन्यात रॉबिन विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आली होती. त्यांच्यावर प्रोविडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. हे वॉरंट आयुक्त सदक्षरी गोपाळ रेड्डी यांनी जारी केले आहे. वॉरंट जारी केल्यानंतर पुलकेशीनगर पोलिसांना आवश्यक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com