Crime News : २ दिवसांपूर्वी हत्या, रील्स बघून गुंता सुटला; एक पुरावा अन् पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले!

Delhi Crime : तपासादरम्यान पोलिसांनी मृत व्यक्तीचा फोन चेक केला. फोन तपासताना पोलिसांनी काही रील्स पाहिल्या. रील्स पाहून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आणि २४ तासांत त्याला अटक केली.
Delhi police reels case
Delhi police reels caseSaam Tv
Published On

Delhi Crime : दिल्लीमध्ये एक आगळीवेगळी घटना घडली आहे. दिल्ली पोलिसांनी रील पाहून आरोपींना अटक केली आहे. तपास करताना पोलिसांनी पीडिताचा मोबाइल चेक केला. त्यांना इन्स्टाग्राम अकाउंटवर रील दिसले. संशय आल्याने पोलिसांनी तपास केला आणि फक्त २४ तासांमध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतले. ही घटना दिल्लीतील केशव पुरम पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे.

७ जानेवारी रोजी दिल्ली पोलीस कंट्रोल रुमला एक फोन आला. फोन करणाऱ्याने केशव पुरमच्या रामपूर परिसरातील एका घरातून दुर्गंध येत असल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोहचल्यावर पोलिसांना अतिशय कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. घरातील आधारकार्डवरुन मृत व्यक्तीचे नाव गोलू आहे असे स्पष्ट झाले. मृतदेह रुग्णालयात पाठवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली.

डीसीपी भीष्म सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलूची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी टीम तयार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यांनी गोलूचा फोन तपासायला सुरुवात केली. दरम्यान इन्स्टाग्रामवर गोलूच्या रील्स पाहिल्या. बऱ्याच रील्समध्ये एक व्यक्ती होता. या व्यक्तीवर पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी रील्समध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली.

चौकशीदरम्यान, रील्समध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव रंजीत असल्याचे पोलिसांनी समजले. हा रंजीत घरी नसून त्याचा मोबाईलदेखील बंद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सीसीटीव्हीमध्येही रंजीत दिसला होता. या सर्व प्रकारावरुन पोलिसांचा संशय वाढत गेला. त्यानंतर पोलिसांनी रंजीतला पकडण्यासाठी छापे मारले. छापेमारी केल्यानंतर पोलिसांनी रंजीत आणि त्याच्या साथीदाराला नीरजला अटक केली.

Delhi police reels case
Mumbai Crime: मुंबईत आईनेच पोटच्या मुलाचा गळा आवळला, धक्कादायक कारण आलं समोर

पोलिसांनी दोघांजवळ गोलूला मारण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार देखील सापडले. चौकशीदरम्यान नीरजने गुन्हा कबूल केला. 'नीरज आणि गोलू बऱ्याच वेळेपासून एकत्र काम करत होते. काम करताना गोलू नीरजला त्रास द्यायचा, त्याचा अपमान करायचा, शिव्या द्यायचा. गोलूने नीरजला मारहाण देखील केली होती. यावरुन रागात नीरजने मित्रासह गोलूची हत्या केली' अशी माहिती पोलिसांनी दिली.

Delhi police reels case
Pune Crime: सासू घरात राहत असल्याने जावयाची सटकली; मारहाण करत केला चाकू हल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com