Pune News Kondhawa Police Busted A Gang Of Bike Thieves Due To Lack Of Number Plate 15 Bikes seized|Saamtv Pune News
मुंबई/पुणे

Pune Crime: नंबर प्लेट नसल्याने संशय आला अन्.. पुण्यात बाईक चोरी करणाऱ्या तिघांना अटक; १५ दुचाकी जप्त

Pune News Update: दुचाकीला नंबरप्लेट नसल्याच्या संशयावरून तपास करत बाईक चोरी करणाऱ्या तिघांना पुण्यातील कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून तब्बल १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. ४ डिसेंबर २०२३

Pune Crime News:

दुचाकीला नंबरप्लेट नसल्याच्या संशयावरून तपास करत बाईक चोरी करणाऱ्या तिघांना पुण्यातील कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांकडून तब्बल १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरात (Pune) गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला होता. हा तपास सुरू असतानाच निखिल राक्षे या तरुणाकडे नंबरप्लेट नसलेली दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

यावरुन संशय आल्याने पोलिसांनी निखिल राक्षेला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच चौकशीदरम्यान आरोपी राक्षेने साथीदार सागर आणि गणेश यांच्या मदतीने दुचाकी चोरल्याचे कबुल केले. त्यानंतर त्याच्या दोन साथिदारांनाही अटक करण्यात आली. या तिघांच्या ताब्यातून १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निखिल सुनील राक्षे (वय २५, रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड), सागर शिवाजी गुंजले (वय २१), गणेश भरत मोहिते (वय २८, दोघे रा. माण, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिनही आरोपींनी मिळून कोंढवा, वानवडी, राजगड, माणगाव, वाठार आणि सासवड परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच या आरोपींंनी अजून कुठे असे गुन्हे केले आहेत का? याचा तपास कोंढवा पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार ₹४०००; पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ, प्रति तोळ्याला 'इतकी' किंमत; चांदी ३ दिवसात १५००० हजारांनी वाढली

Black Raisin Benefits: हिवाळ्यात फक्त आठवडाभर खा भिजवलेले काळे मनुके, शरीरात दिसतील जबरदस्त बदल

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT