Pune News Saam Tv News
मुंबई/पुणे

Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, रुग्णाचा आकडा ५९ वर; काय आहेत लक्षणं?

Pune health alert GBS: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येमध्ये दोन दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या २२ वरून थेट ५९ वर पोहचली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम या नव्या आजाराने डोकं वर काढले आहे. या आजारामुळे पुण्यामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला आहे. कारण पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यात आतापर्यंत या आजाराचे २२ रुग्ण आढळले होते. पण आता रुग्णांच्या आकड्यात वाढ होऊन तो ५९ वर पोहचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येमध्ये दोन दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या २२ वरून थेट ५९ वर पोहचली आहे. या रुग्णांमध्ये ३८ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे. गुलेन बॅरी सिंड्रोमची बाधा झालेले १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यातील विविध हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पुणे महापालिकेचं शीघ्र कृती दल या आजारामुळे सध्या अलर्ट मोडवर आहेत. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या परिसरातले पाण्याचे नमुने महापालिकेकडून तपासले जात आहेत. गुलेन बॅरी सिंड्रोम हा दुर्मिळ आजार असला तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांच मत आहे. तरी देखील या आजाराचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुणेकर चिंतेत आले आहेत.

दरम्यान, पाण्याचे स्त्रोत महानगरपालिकेने तपासावेत असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. ज्या भागामध्ये, कॉलनीमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत त्या भागातील पाण्याचे स्रोत महानगरपालिकेने तपासावेत असे पुलकुंडवार यांनी सांगितले. पुणे शहर आणि परिसरात जीबीएसचे रुग्ण आढळून आल्याच्या आरोग्य यंत्रणांकडून उपचार आणि उपायोजनाचा आढावा घेतला गेले.

गुलियन बॅरी सिंड्रोम हा आजार नेमका कशामुळे होतोय याची माहिती व्‍हावी यासाठी दवाखान्यात भरती असलेल्या रुग्णांची माहिती घेऊन त्याचा अभ्यास करण्याच्या सूचना देखील पुलकुंडवार यांनी दिल्या आहेत. गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे पहिले लक्षण अशक्तपा आणि हातापायाला मुंग्या येणे हे आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये या आजाराची लागण झालेले जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने हिच लक्षणं दिसून आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT