Popcorn Brain सिंड्रोम काय आहे? कसे कराल स्वत:ला कंट्रोल? जाणून घ्या

How To Care Your Mental Health : बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, कामाचा वाढता ताण यामुळे शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे. आपल्या जीवनशैलीचा आपल्या मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम होतो.
Popcorn Brain, How To Care Your Mental Health
Popcorn Brain, How To Care Your Mental HealthSaam Tv
Published On

Popcorn Brain Symptoms :

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, कामाचा वाढता ताण यामुळे शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे. आपल्या जीवनशैलीचा आपल्या मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम होतो.

हल्ली मानसिक आरोग्याशी (Health) संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. त्यातील एक पॉपकॉर्न ब्रेन ही समस्या जी सध्या अधिक ट्रेंडमध्ये आहे. हा आजार (Disease) आहे की, आणखी काही जाणून घेऊया.

1. पॉपकॉर्न ब्रेन म्हणजे काय?

पॉपकॉर्न ब्रेन हा नवीन शब्द उदयास आला आहे. यामध्ये विचार अतिवेगाने मनात येतात. ज्यामुळे मेंदूवर लक्ष केंद्रित करता येत नाही. ही परिस्थिती प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. काही काळानंतर ती अधिक तीव्र होताना दिसून आली आहे.

Popcorn Brain, How To Care Your Mental Health
No Smoking Day 2024 : महिलांनो, धुम्रपान केल्यामुळे येतेय वंध्यत्व, वेळीच थांबा!

2. मेंदूवर कसा होतो परिणाम?

यामध्ये तुमचे स्वत:च्या मेंदूवर लक्ष ठेवणे कठीण जाते. ज्यामुळे कोणत्याही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. तसेच तुम्हाला जगापासून वेगळे करु शकते त्यामुळे तणाव (Stress) निर्माण होतो.

3. लक्षणे कोणती?

  • पॉपकॉर्न सिंड्रोममुळे लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते किंवा वारंवार व्यत्यय आल्याने तुम्ही सतत विचलित होऊ शकता.

  • एकाच कामावर लक्ष ठेवणे कठीण होते तसेच यामध्ये संघर्ष करावा लागतो.

  • एखाद्या गोष्टीचा आपल्याला ओव्हरलोड वाटतो, ज्यामुळे तणाव आणि अस्वस्थतेची भावना निर्माण होते.

  • सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या सध्याच्या परिस्थितीला जुळवण्याचा प्रयत्न करणे. तसेच स्वत:चे मूल्य तपासणे

Popcorn Brain, How To Care Your Mental Health
Pigeons Affect Health : कबुतर पाळताय? संपर्कात आल्यामुळे फुफ्फुसांवर होतोय विपरीत परिणाम, डॉक्टरांनी दिली माहिती

4. यावर मात कशी कराल?

  • मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा मर्यादित प्रमाणात वापर करा. तसेच त्यासाठी वेळ निश्चित करा.

  • लक्ष केंद्रित करण्यासाठी ध्यान आणि दीर्घ श्वासोच्छवास यांसारख्या पद्धतींचा अवलंब करा.

  • तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी वेळापत्रक तयार करा. ज्यामुळे काम करताना विचार येणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com