Pune Police: "ईट का जवाब पत्थर से देंगे", पुणे पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना सज्जड दम

Pune Police Commissioner Amitesh Kumar: पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे. यावेळी आयुक्तांनी गुन्हेगारांना चांगलाच दम दिला आहे.
Pune Police: "ईट का जवाब पत्थर से देंगे", पुणे पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना सज्जड दम
Pune Police Commissioner Amitesh KumarTimes of India
Published On

अक्षय बडवे, पुणे

कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही 'ईट का जवाब पत्थर से देंगे' असा इशारा पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे पोलिसांच्या वतीने आज किंमती मुद्देमाल वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा हे उपस्थित होते. यावेळी ३०० लाभार्थी यांना ३ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला.

यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 'आम्ही नागरिकांना त्यांचा मुद्देमाल परत करून उपकार करत नाही, ते आमचे काम आहे. आम्ही प्रत्येक वेळा आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना या बद्दलच्या सूचना दिल्या आहे. जो मुद्देमाल आम्हाला मिळाला आहे, तो मुद्देमाल पुढील काळात १ महिन्यात कायद्याच्या पूर्णबाबी कार्यवाही करून नागरिकांना परत देण्याचा मानस आम्ही ठेवला आहे.'

Pune Police: "ईट का जवाब पत्थर से देंगे", पुणे पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना सज्जड दम
Kalyan Crime : कल्याण- डोंबिवलीत १३ अंमली पदार्थ तस्कर ताब्यात; कल्याण डीसीपी स्कॉडची वीस दिवसात कारवाई

पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात -

याच कार्यक्रमाच्या दरम्यान पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला. "पुणे शहर पोलिस दल शहरात कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, वाहतुकीचे नियमन हे आमचे प्राधान्याचे विषय आहेत. कधी कधी एखादी घटना झाल्यावर एक narrative सेट होतो की पुणे गुन्हेगारीची राजधानी झाली आहे. आकडेवारी नुसार पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. पुणे शहरात खून किंवा खुनाचे प्रयत्न या घटनांमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी घट झाली आहे. एम पी डी ए कायद्याच्या अंतर्गत तब्बल १०० जणांवर आम्ही कारवाई केली आहे.

Pune Police: "ईट का जवाब पत्थर से देंगे", पुणे पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना सज्जड दम
Pune Crime News : हाती हत्यार आणि तोंडात गुंडाचे नाव, पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच

कोयता गँग शहरात कार्यरत नाही -

पुणे शहरात कुठलीही गॅंग नाही. आज कोणीही काही झालं तरी म्हणतोय कोयता गँग आहे अशी कुठली गँग शहरात कार्यरत नाही मात्र असे कोणी गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करत असतील तर कायद्याच्या चौकटीत राहून "आम्ही एकदा जवाब पत्थर से देंगे" अशी भूमिका यांनी यावेळी मांडली.

Pune Police: "ईट का जवाब पत्थर से देंगे", पुणे पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना सज्जड दम
Buldhana Crime : महावितरणच्या विद्युत पोल वरील तारा पुन्हा चोरीला; आसलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

पोर्शे अपघातातील आरोपींना जामीन द्यायला कोणी नाही -

यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोर्शे अपघाताचा संदर्भात पुणे पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल सुद्धा भाष्य केलं.'पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. काही जणांनी तर आमच्यावर एक भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप लावले. या संपूर्ण प्रकरणात आम्ही जे दोषी होते तिच्यावर कारवाई केली मग ते ससूनचं डॉक्टर असो किंवा इतर. आज या प्रकरणातील बाप, हॉस्पिटल मधील डॉक्टर गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून जेलमध्ये बंद आहेत आता तर त्यांना जामीन देण्यासाठी कोणी येत नाही.', असं पोलिस आयुक्त म्हणाले.

Pune Police: "ईट का जवाब पत्थर से देंगे", पुणे पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना सज्जड दम
Wada Crime : सहा महिन्यांपूर्वी घरातून दागिने चोरीचा उलगडा; चोरी करणारी महिला गजाआड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com