Kalyan Crime : कल्याण- डोंबिवलीत १३ अंमली पदार्थ तस्कर ताब्यात; कल्याण डीसीपी स्कॉडची वीस दिवसात कारवाई

Kalyan News : गेल्या महिनाभरापासून रात्री अपरात्री रस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या, खुलेआम नशा करणाऱ्या नशेखोरा विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या विरोधात पोलिसांनी फार्स आवळला आहे
Kalyan Crime
Kalyan CrimeSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण- डोंबिवलीमध्ये नशेखोरांसह अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या विरोधात धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. यात कल्याण डीसीपी स्कॉडने मागील २० दिवसात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ८ गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. एमडी ड्रग्ज आणि गांजा तसेच कोडीनयुक्त बाटल्या मिळून ३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

कल्याण- डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नशेचा धंदा सुरू असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली होती. तरुणांमध्ये विशेषतः महाविद्यालयीन तरुण, तरुणी नशेच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून नशेचा धंदा करणाऱ्या तसेच नशेखोराविरोधात फार्स आवळण्यास सुरुवात करत कारवाई करण्यात येत आहे. 

Kalyan Crime
Pune Police : पुण्यात एमडी ड्रग्सनंतर अफिमची विक्री, राजस्थानच्या तरुणाकडून २१ लाखांचे अफिम जप्त

१३ तस्कर पोलिसांच्या ताब्यात 

गेल्या महिनाभरापासून रात्री अपरात्री रस्त्यात धिंगाणा घालणाऱ्या, खुलेआम नशा करणाऱ्या नशेखोरा विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या विरोधात देखील पोलिसांनी फार्स आवळला आहे. कल्याण- डोंबिवली परिसरात गेल्या २० दिवसात अमली पदार्थ विकणाऱ्या तब्बल १३ तस्करांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाजारपेठ, कोळशेवाडी, विष्णूनगर पोलीस ठाणे, टिळक नगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर खडकपाडा आणि मानपाडा पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. 

Kalyan Crime
Bogus Crop Insurance : नाशिक जिल्ह्यात ३६०० हेक्टर क्षेत्राचा बोगस पीक विमा; शेतकऱ्यांनी उतरविलेला विमा होणार रद्द

साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

कल्याण- डोंबिवलीमधील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आठ गुन्ह्यातून एकूण १३ तस्करांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून एमडी पावडर, कोडीनयुक्त बॉटल, गांजाचा साठा असा मिळून ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे कल्याण परिमंडळ तीनचे डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com