Bogus Crop Insurance : नाशिक जिल्ह्यात ३६०० हेक्टर क्षेत्राचा बोगस पीक विमा; शेतकऱ्यांनी उतरविलेला विमा होणार रद्द

Nashik News : नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक लागवड न करता पिक विमा उतरवल्याचा निदर्शनास आले होते. प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा बोगस पिक विमा उतरवल्याच्या संख्येत सर्वाधिक
Bogus Crop Insurance
Bogus Crop InsuranceSaam tv
Published On

नाशिक : शेतातील पिकांचे नैसर्गिक संकटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळे सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरु करत शेतकऱ्यांच्या पिकांना एक प्रकारे सुरक्षा कवच दिले आहे. मात्र यात काही शेतकऱ्यांकडून बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे. पीक लागवड नसताना त्याठिकाणच्या क्षेत्रावर पीक विमा काढण्याचे समोर आले आहे. अशा बोगस विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्यात येणार आहे. 

खरीप व रब्बी हंगामात पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक लागवड न करता पिक विमा उतरवल्याचा निदर्शनास आले होते. प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा बोगस पिक विमा उतरवल्याच्या संख्येत सर्वाधिक असल्याचं कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. 

Bogus Crop Insurance
Ahilyanagar : ओढ्यात सोडले रसायनयुक्त पाणी; शेतातील पिके जळाली; मासेही आढळली मृतावस्थेत

३६०० हेक्टर क्षेत्राचा बोगस विमा 

नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा सर्वाधिक मोठा आहे. नाशिक जिल्ह्यात ५ हजार १७२ शेतकऱ्यांनी ३६०० हेक्टर क्षेत्रावर बोगस पिक विमा उतरल्याचे समोर आले आहे. अर्थात कमी क्षेत्रावर लागवड झालेली नसल्याचा शेतकऱ्यांनी न कळल्याने ही बाब समोर आली आहे. यामुळे कृषी विभागाकडून याची तपासणी करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

Bogus Crop Insurance
Climate change : वातावरणातील बदलाचा हरभरा, मिरचीवर रोग; हरभऱ्यावर अळी आणि मर रोगांचा प्रादुर्भाव

विमा होणार रद्द 

कृषी विभागाने विमा कंपन्यांना बोगस पिक विमा उतरवल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नाशिकच्या उपसंचालक कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे. मुळात कृषी विभागाच्या पडताळणीनंतर सरकारच्या तिजोरीचा कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड वाचला आहे. तर बोगस पिक विमाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर येणाऱ्या काळात कृषी विभाग पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून सीएससी सेंटरला भेटी देऊन पिक विमा उतरवल्याची पडताळणी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com