Buldhana Crime : महावितरणच्या विद्युत पोल वरील तारा पुन्हा चोरीला; आसलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

Buldhana News : जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत मागील तीन महिन्यापासून दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. स्थानिक पोलीस प्रशासन चोरीला आळा घालण्यास अकार्यक्षम ठरत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त
Buldhana Crime
Buldhana CrimeSaam tv
Published On

बुलढाणा : महावितरणकडून विद्युत प्रवाह जोडणीसाठी पोल उभारणी करत विद्युत तारा टाकलेला असतात. या तारा चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव शेत शिवारात समोर आला आहे. मागील काही दिवसांपासून हे प्रकार सुरु असताना देखील पोलीस प्रशासनाकडून अद्यापपर्यंत चोरट्यांचा शोध घेण्यात यश मिळालेले नाही. 

बुलढाण्याच्या जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत मागील तीन महिन्यापासून दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. परंतु स्थानिक पोलीस प्रशासन सततच्या चोरीला आळा घालण्यास अकार्यक्षम ठरत असल्याने तालुका परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. दररोज घडणाऱ्या चोरीच्या घटनेत तक्रार दिली जाते; परंतु पोलीस येतात आणि पंचनामा करतात आणि निघून जातात. मात्र चोरटे अद्याप सापडलेले नाही. 

Buldhana Crime
Jyotiba Temple : खव्याच्या प्रसादात ब्लेडचा तुकडा; ज्योतिबा मंदिर परिसरातील प्रसाद विक्रीच्या दुकानातील प्रकार 

विद्युत पोलवरील तारा चोरीला 

अशातच रात्रीच्या दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव शेत शिवारातील महावितरणच्या विद्युतपोल वरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरीला गेल्या आहेत. यापूर्वी सुद्धा मागील पाच महिन्यात आसलगाव परिसरातील विद्युत पोलवरील तारा मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्या होत्या. याबाबत तक्रार दाखल आहेत. परंतु आजपर्यंत तक्रारीची निवारण झाले नाही किंवा आरोपीचा शोध सुद्धा लावण्यात आला नाही.  

Buldhana Crime
Miraj News : नशेसाठी औषधांची विक्री करणारी टोळी ताब्यात; इंजेक्शन व गोळ्यांसह साडेचौदा लाखांचा साठा जप्त

शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा 

चोरांना जेरबंद करण्यास किंवा सतत होणाऱ्या चोरीच्या घटनेस आळा घालण्यात जळगाव जामोद पोलीस प्रशासन हतबल झाले आहे. याचा फायदा चोरटे घेत आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनावर विश्वास नसल्याने आसलगाव येथील शेतकऱ्यांनी सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीची त्वरित दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी त्रस्त शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com