Jyotiba Temple : खव्याच्या प्रसादात ब्लेडचा तुकडा; ज्योतिबा मंदिर परिसरातील प्रसाद विक्रीच्या दुकानातील प्रकार 

Kolhapur News : दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थानाला दररोज हजारो भाविक भेट देत असतात. मंदिर परिसरात अनेक मिठाई आणि प्रसादाची दुकाने आहेत. दुकानांमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात
Jyotiba Temple
Jyotiba TempleSaam tv
Published On

रणजीत माजगावकर  
कोल्हापूर
: दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरातील एका दुकानांमध्ये विक्रीसाठी असलेल्या प्रसादाच्या खव्यात ब्लेड सापडल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्योतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील नवाळे यांनी घेतलेल्या प्रसादात हे ब्लेड सापडले आहे. या प्रकाराबाबत नवाळे यांनी याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र देवस्थानाच्या परिसरातून भाविक घेत असलेला प्रसाद खाणे योग्य आहे का?, भेसळ युक्त आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत.

कोल्हापूरच्या दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थानाला दररोज हजारो भाविक भेट देत असतात. त्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात अनेक मिठाई आणि प्रसादाची दुकाने थाटलेली आहेत. ज्योतिबा मंदिर परिसरात असणाऱ्या दुकानांमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. हे पदार्थ अनेक भाविक देवाचा प्रसाद म्हणून घरी घेऊन जात असतात. 

दुकानांमध्ये मिळणाऱ्या प्रसादात बेंडबत्ताशीच पाकीट, चिरमुरेचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, फुटाणे आणि तिळगुळ हा पारंपारिक प्रसाद मानला जातो. तर भाविक प्रसाद म्हणून खव्याचे पेढे, लाडू, खवा, खव्याची बर्फी, विविध ड्रायफ्रूट्सने तयार करण्यात आलेली बर्फी घेऊन जात असतात. 

Jyotiba Temple
Jyotiba Temple : दख्खनचा राजा ज्योतिबा मूर्तीचे दर्शन चार दिवस बंद; दर्शनासाठी वेगळी व्यवस्था, मूर्ती संवर्धन प्रक्रियेला सुरवात

खाव्यात आढळला ब्लेडचा तुकडा 

दरम्यान याच दुकानात जोतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील नवाळे रविवारी खवा घेण्यासाठी गेले असता त्यांना खव्यामध्ये ब्लेडचा तुकडा सापडला. याची गंभीर दखल घेत त्यांनी या संदर्भातली तक्रार जिल्हा प्रशासनाकडे नोंदवलेली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ज्योतिबा देवस्थान परिसरात असणाऱ्या सर्व दुकानांची तपासणी करून संबंधित दुकानदारावर कारवाई करावी; अशी मागणी त्यांनी केलेली आहे.

Jyotiba Temple
Wada Crime : सहा महिन्यांपूर्वी घरातून दागिने चोरीचा उलगडा; चोरी करणारी महिला गजाआड

गतवर्षी आढळले होते भेसळयुक्त पेढे 

गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये पारंपारिक पद्धतीने मिळणाऱ्या प्रसादाची जागा आता लाडू, पेढे आणि ड्रायफ्रूटच्या बर्फीने घेतलेली आहे. गेल्या वर्षीच्या जोतिबा यात्रेमध्ये ज्योतिबा देवस्थान परिसरात १ टन भेसळयुक्त पेढे सापडल्याचा दावा देखील करण्यात आला होता. मात्र त्याचं पुढं काय झालं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

प्रसादाबाबत काहीही सूचना नाही 
मात्र हे पदार्थ स्थानिक ठिकाणी तयार होतात का? ते बाहेरून मागवण्यात येतात? ते किती दिवस टिकतात? यासंदर्भात कुठेही सूचना देणारे स्टिकर्स त्यावर चिटकवलेले नसतात. त्यामुळे अनेकवेळा प्रसाद म्हणून देवस्थानावरून आणलेले पदार्थ खाल्ल्याने भाविकांना त्रास जाणवतो. राज्यातील विविध देवस्थानाच्या ठिकाणी मिळणारे खाद्यपदार्थ, प्रसाद याच्यावर शासनाचे देखील नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com