Maji Ladki Bahin Yojana Latest News:  Saamtv
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीमुळे भाजप आमदार अडचणीत! बॅनरवरुन वाद, महिलांनी घेतली थेट पोलिसात धाव; नेमकं काय घडलं?

Gangappa Pujari

अक्षय बडवे| पुणे, ता. ३० जुलै २०२४

शिंदे सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. राज्यभरातून महिला वर्गाचा या योजनेला मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून या योजनेची जोरदार जाहिरातबाजी केली जात आहे. मात्र हीच जाहिरातबाजी पुण्यातील भाजप आमदारच्या अंगलट आली असून महिलांनी थेट पोलिसांत तक्रार केली आहे. काय आहे प्रकरण? वाचा...

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून लोकप्रतिनिधींकडूनही या योजनेचा अर्ज भरुन घेण्यासाठी मदत करत आहेत. तसेच जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच लाडकी बहीण योजनेची जाहिरातीवरुन पुण्याचे भाजप आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्याविरोधात महिलांनी पोलिसात धाव घेतली आहे.

सिद्धार्थ शिरोळे हे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर लावले होते. ज्यावर मुख्यमंत्री, उपमुख्ममंत्री यांच्यासह आमदार सिध्दार्थ शिरोळे याच्यासोबत काही महिलांचे फोटो लावले होते. या बॅनरवर सहमती शिवाय फोटो लावल्याचा आरोप त्या फोटोतील महिलांनी केला आहे.

याप्रकरणी संबंधित महिलांनी पोलिसांत धाव घेतली असून आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

SCROLL FOR NEXT