Influencer Accident:'बिग बॉस' फेम इन्फ्लुएंसरचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारचा अक्षरश: चुराडा

Influencer Accident on Samruddhi Mahamarg: बिग बॉस फेम शिवआशिष मिश्राचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत.
bigg boss fame shivashish mishra accident samruddhi mahamarg
bigg boss fame shivashish mishra accident samruddhi mahamargSaam Tv
Published On

Influencer Accident on Samruddhi Mahamarg: 'बिग बॉस' सीझन १२ मधील स्पर्धक म्हणून ओळखला जाणारा इन्फ्लुएंसर आणि अभिनेता शिवआशिष मिश्रा याचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या अपघातात मिश्रा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यासोबत असलेला सहकारी गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना अचानक वाहनाचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, मिश्रा याला गंभीर दुखापत झाली. विशेषतः त्याच्या बरगड्यांना मोठी दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. घटनेनंतर तातडीने स्थानिकांनी आणि आपत्कालीन सेवांनी मदत करत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

bigg boss fame shivashish mishra accident samruddhi mahamarg
Dhurandhar 2: पहिल्याच दिवशी २०० कोटी तर एका आठवड्यात ५०० कोटी; रणवीर सिंगचा 'धुरंधर २' करणार नवा रेकॉर्ड

प्राथमिक उपचारासाठी शिवआशिष मिश्रा याला कोपरगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याची प्रकृती पाहून पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

bigg boss fame shivashish mishra accident samruddhi mahamarg
Super Duperr Movie: एक फ्लॅट, दोन कुटुंब...; निर्मिती सांवत आणि च्या 'सुपर डुपर'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

या अपघातामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवआशिष मिश्रा हा ‘बिग बॉस’ सीझन १२ मधून प्रसिद्धीझोतात आला होता. त्याच्या फिटनेसमुळे त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com