Pune News x
मुंबई/पुणे

पोहायला गेले पण परतलेच नाही.. १३ वर्षीय चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू, पालकांच्या मन हेलावणाऱ्या आक्रोशानं पुणे हळहळलं

Pune News : चाकणच्या जवळच्या कडाचीवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या चार १३ वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या मुलांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

Yash Shirke

रोहिदास गाडगे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : पुण्यातील चाकण जवळील कडाचीवाडी येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाण्यात पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच वेळी चार मुलांचा मृत्यू झाल्याने चाकण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चारही मुलं पाण्यामध्ये पोहण्यासाठी पाण्यामध्ये उतरली होती. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला असल्याचे म्हटले जात आहे.

पाण्यात बुडून मृत्यु झालेल्या चार मुलांची नावे...!

1) ओमकार बाबासाहेब हंगे वय 13 वर्ष, राहणार मार्तंड नगर मेदनकरवाडी मूळ राहणार हंगेवाडी तालुका केज जिल्हा बीड

2) श्लोक जगदीश मानकर वय 13 वर्षे, राहणार मेदनकरवाडी ता. खेड मूळ राहणार धनवडी तालुका वरुड जिल्हा अमरावती

3) प्रसाद शंकर देशमुख वय 13 वर्ष, राहणार मेदनकरवाडी ता.खेड मूळ राहणारअंबुलगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड

4) नैतिक गोपाल मोरे वय 13 वर्ष, राहणार मेदनकरवाडी ता. खेड बुलढाणा झरी बाजार तालुका अकोट जिल्हा अकोला

पाण्यात बुडालेल्या चारही अल्पवयीन मुलांचे वय १३ वर्ष इतके आहे. चारही मुलं मेदनकरवाडी येथे वास्तव्याला होते. चौघे मित्र मज्जामस्तीसाठी पाण्यात पोहायला गेले होते. पण पाण्यात खेळायला, पोहायला जायचा या मुलांचा निर्णय फसला. ते चौघेही पाण्यात बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून चौघांचाही मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : - राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंडल यात्रा जालन्यात दाखल

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT