वैष्णवीनंतर आता प्रिया; लग्न होताच पाच महिन्यात हुंड्यासाठी छळ,सरकारी नोकरी लागूनही महिलेनं जीवन संपवलं, चिठ्ठीत लिहिलं...

Dowry Harassment Case : वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी गजाआड आहेत. हे प्रकरण ताजे असताना प्रिया दीक्षित ही विवाहिता हुंडाबळीची शिकार बनल्याची माहिती समोर आली आहे.
Dowry Harassment Case
Dowry Harassment Casex
Published On

वैष्णवी हगवणे या पुण्यातील विवाहितेचा हुंड्यापायी जीव गेला. सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने स्वत:चे जीवन संपवले. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैष्णवीचे प्रकरण ताजे असतानाच असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी नोकरी लागून जून महिन्यात कामावर रुजू होणाऱ्या प्रिया दीक्षितच्या मृत्यू प्रकरणाची माहिती समोर आली आहे.

वैष्णवीप्रमाणे नवविवाहित प्रियाने देखील आत्महत्या केली. प्रिया दीक्षित उत्तरप्रदेशच्या लखनऊमध्ये राहत होती. ठाकूरगंज परिसरात राहणाऱ्या प्रियाच्या आत्महत्येच्या बातमीमुळे लखनऊमध्ये खळबळ उडाली आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर तिने चार वेळा टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली होती. यूपी सरकारच्या बालविकास विभागात तिची निवड झाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी प्रियाने २ पानांची सुसाईट नोट लिहिली. यात तिने पती शुभम आणि सासरकड्या मंडळींवर अनेक आरोप केले.

Dowry Harassment Case
Crime : वहिनीने आंबे तोडले, दीराच्या डोक्यात तिडीक गेली; धारदार शस्त्रानं शीर धडावेगळं केलं; अन्...

प्रियाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, १० डिसेंबर २०२४ रोजी प्रियाचे लग्न शुभम टंडनशी झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी प्रियाचा सासरी छळ व्हायला सुरुवात झाली. हुंडा न दिल्याने प्रियाला सासरी टोमणे मारले जात. त्यानंतर तिला मारहाण व्हायला सुरुवात झाली. सासरचे लोक प्रियाला शारीरिक-मानसिक त्रास देत होते.

Dowry Harassment Case
MP: आणखी एक 'निर्भया'! प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड अन्...; गर्भाशय शरीराबाहेर आढळलं, नराधमांचं महिलेसोबत अमानवी कृत्य

हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने प्रियाला घरातून हाकलून देण्यात आले होते. ती तब्बल सहा तास घराबाहेर उभी होती. पोलिसांना फोन केल्यानंतर तिला घरात प्रवेश मिळाला. सासरकडचे लोक प्रियाला वारंवार माहेरी पाठवत होते. प्रियाचा नवरा, शुभम तिला मारहाण करायचा. मारहाण केल्यानंतर तिला हसायला लावायचा, फोटो काढायला तिला जबरदस्ती करायचा.

Dowry Harassment Case
लग्नासाठी मुली दाखवू, सिंधुताई सपकाळ संस्थेच्या नावाने फसवणूक; आमिष दाखवून मुलांच्या कुटुंबांकडून हजारो रुपये लुबाडले

प्रियाने सुसाईड नोटमध्ये पती, सासू, सासरे यांच्यावर अनेक आरोप केले. शुभम आणि सासरच्यांनी उशीने प्रियाला मारुन टाकण्याचा प्रयत्न केला होता. तिने पोलिसांना फोन केला. पण काही मदत मिळाली नाही. तिने पोलिसांसह महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. शेवटी छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रियाने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

Dowry Harassment Case
Mi Vs GT : गुजरातला Eliminator मध्ये हरवलं तरीही IPL 2025 जिंकण्यापासून मुंबई राहणार दूर? आकडेवारीने टेन्शन वाढवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com