Pune Youth Dies In Beating Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पेट्रोल चोरी केल्याचा संशय, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Pune Youth Dies In Beating: पुण्यात पेट्रोल चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये गु्न्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पुण्यामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. किरकोळ वादातून हत्या, मारहाण, अत्याचार, विनयभंग असा घटना घडत आहे. अशामध्ये पुण्यात पेट्रोल चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नऱ्हे येथे तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये समर्थ भगत या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पेट्रोल चोरीच्या संशयावरून मारहाणीत समर्थचा मृत्यू झाला. याबाबत समर्थचे वडील नेताजी भगत यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गौरव कुटे, अजिंक्य गांडले आणि राहुल लोहार या तरुणांना पोलिसांनी अटक केली.

नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या कार्यालयासमोर समर्थ हा गाडीतील पेट्रोल संपल्याने तो दुसऱ्या गाडीतील पेट्रोल काढत होता. त्यावेळी गौरव कुटे आणि त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी समर्थला चोर समजून लाथाबुक्यांनी, काठी आणि सायकलच्या साखळीने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये समर्थ गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले. पण उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यात कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली

Milk: रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने काय होते?

Evil Eye: नजर लागल्यावर दिसू लागतात 'हे' ४ संकेत, मुळीच करू नका दुर्लक्ष!

Tulja Bhawani : तुळजाभवानी देवीचे १ ऑगस्टपासून दर्शन बंद; भाविकांसाठी केवळ मुखदर्शन

Maharashtra Politics : जुन्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? भाजपमधील इनकमिंगवरून माजी आमदाराने सांगितली मनातील सल

SCROLL FOR NEXT