Latur Crime: धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेतील १६ विद्यार्थिनींचा विनयभंग, शिक्षकाविरोधात गुन्हा

Latur Girl Student Molested By Teacher: लातूर जिल्ह्यातल्या एका गावातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकाने १६ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली. यामुळे खळबळ उडाली आहे.
Latur Crime
Latur CrimeSaam TV
Published On

लातूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वर्गशिक्षकाने १६ विद्यार्थिनींचा विनयभंग केला. याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातल्या एका गावातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील शिक्षकाने १६ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली. विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

Latur Crime
Latur News: एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या, एकाच चितेवर तिघांवर अंत्यसंस्कार

अण्णा श्रीरंग नरसिंगे असं आरोपी शिक्षकाचे नाव आहे. आरोपी विद्यार्थिनींसोबत अश्लील बोलत होता, अपमानास्पद बोलून असभ्यवर्तन कर होता तसंच त्यांचा विनयभंग करत होता असं तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत अधिकचा तपास एमआयडीसी पोलिस अधिकारी करत आहेत.

Latur Crime
Latur News : पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; ५० जणांना घेतले ताब्यात

दरम्यान, विशाखा समितीने पीडित विद्यार्थिनींशी संवाद साधला. जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील पीडित विद्यार्थिनींशी विशाखा समितीच्या सदस्यांनी संवाद साधत जबाब नोंदवून घेतले आहेत. यामध्ये विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर या शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्याच्याविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latur Crime
Latur News : लातूरमध्ये भाजपला खिंडार; माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com