Markadwadi Voting : ग्रामस्थांवर पोलिसांचा दबाव, गुन्हा दाखल करण्याची धमकी, आमदार जानकरांचा गंभीर आरोप

Solapur Markadwadi Village Voting : मारकडवाडीत तणाव वाढला, पोलिसांकडून धमकी, जानकरांचा आरोप, ग्रामस्थांची मतदानाकडे पाठ फिरवली आहे. बॅलेट पेपरवरील मतदान घेण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय.
 Uttam Jankar
Uttam Jankar Saam Tv
Published On

Markadwadi Voting : मारकरवाडीमधील गावकऱ्यांकडून बॅटेल पेपरवरील मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आली. पण पोलिसांचा याला विरोध आहे. सकाळपासूनच गावात पोलिस तळ ठोकून होते. पोलिसांना पाहून नागरिकांकडून मतदानाकडे पाठ फिरवली. अखेर मारकडवाडीत मतदान घेण्याचा निर्णय मागे घेण्यात आला.

आमदार उत्तम जानकर यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. गावात दडपशाही सुरू असल्याची प्रतिक्रिया उत्तम जानकर यांनी दिली. आम्ही न्यायालयातील लढा लढू, पण गावात बॅलेट पेपरवरच मतदान घेऊ, असे जानकर म्हणाले. पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही जानकर यांनी केलाय.

नागरिक चर्चा करत आहेत. एक मत जरी पडलं तरी कारवाई करू, असा दम पोलिस प्रशासनाकडून दे्यात आलाय. जर इकडे काही घडलं तर आपण जबाबदार असाल. मतदान करायला येणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहेत. पोलिसांकडून परवानगी मिळत नाही. पण ही लढाई सोडणार नाही.
उत्तम जानकर, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट

ईव्हीएमच्या विरोधात सोलापूरमधील गावकऱ्यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. मागील चार ते पाच दिवसांपासून गावकऱ्यांनी तयारी केली. प्रसारमाध्यमांत आल्यानंतर माळशिरसमधील मारकडवाडी गाव चर्चेत आले. प्रशासनाकडून बॅलेट पेपरवरील मतदानाला पारवानगी नाकारली. तरीही गावकऱ्यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाकडून गावात जमावबंदीचा आदेश लागू केला. आज मतदान पार पडणार असल्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. जर मतदान सुरू झालं, तर कारवाई केली जाईल, असा इशाराच जून पोलिसांकडून दिला गेला. त्यामुळे सगळी तयारी झाली, असतानाही गावकऱ्यांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

 Uttam Jankar
Markadwadi Voting : बुलेट झेलू पण बॅलेट पेपरवर मतदान घेऊच, मारकडवाडीमधील गावकरी ठाम, प्रशासनाकडून संचारबंदी

सकाळी आठ वाजल्यापासून गावकरी मतदान केंद्राकडे जमण्यास सुरुवात झाली. मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येनं गावकरी जमले होते. पण तिकडेच पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. आठ वाजता मतदान सुरु होणार होते, पण पोलिसांना पाहून अनेकांनी मतदानाकडे पाठ फिरवली. ग्रामस्थांवर पोलिसांचा दबाव असल्याची प्रतिक्रिया जानकर यांनी दिली. जर नियम मोडला तर गुन्हा दाखल करू असा सज्जड दम पोलिसांनी गावकऱ्यांना दिला. त्यामुळे आक्रमक असणारे गावकरी थोड्यावेळातच शांत झाले.

 Uttam Jankar
Supreme Court : मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1200 वरून 1500 का केली? निवडणूक आयोगला कोर्टाचा सवाल

मारकडवाडी गाव दडपशाही, दहशतीखाली आहे, असे जानकरांनी सांगितले. मताला येणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहेत. त्यामुळे गावकरी मतदान करायला येण्यास तयार नाहीत. मतदानाला पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही. पण आम्ही ही लढाई सोडणार नाही. वेळ पडल्यास कोर्टात जाऊ, अशी प्रतिक्रिया माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com