Sassoon Hospital Sting operation: ससून रुग्णालयामध्ये रुग्णांची लूट सुरू, स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Pune Sassoon Hospital Sting operation Video: ससून रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sassoon Hospital: ससून रुग्णालयामध्ये रुग्णांची लूट सुरू,  स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Sassoon HospitalSaam TV
Published On

अक्षय बडवे, पुणे

पोर्शे कार अपघात प्रकरण (Pune Porsche Car Accident) आणि ड्रग्ज प्रकरणामुळे पुण्यातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय ससून हे चर्चेत आहे. या रुग्णालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. असे असताना आता आणखी एका प्रकरणामुळे ससून रुग्णालय चर्चेत आले आहे. ससून रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनीच याचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावरवर व्हायरल होत आहे. ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि खासगी मेडिकल धारक हातमिळवणी करून रुग्णाची लूट करत असल्याचा काही नागरिकांनी आरोप केला आहे. यासंदर्भात रुग्णांच्या काही नातेवाईकांनी स्टिंग ऑपरेशन करून ससून रुग्णालयातील हा प्रकार समोर आणला आहे. उपचारासाठी ससूनमधील कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या नातेवाईकाकडे २४ हजार रुपये मागितल्याचा आरोप आहे. ससून रुग्णालयामध्ये रुग्णांची होणारी लूट या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र मुस्लीम कॉन्फर्स संघटनेने केली आहे.

Sassoon Hospital: ससून रुग्णालयामध्ये रुग्णांची लूट सुरू,  स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Pune Accident News: पुण्यातील मार्केट यार्ड भागात भीषण अपघात; भरधाव डंपरची दुचाकीला धडक, महिला जागीच ठार

महाराष्ट्र मुस्लीम कॉन्फर्स संघटनेने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकामध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, 'आमच्या संघटनेकडे ससून रुग्णालयासंदर्भात तक्रार आली होती. या तक्रारीनंतर संघटनेकडून प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन पाहणी करण्यात आली. या रुग्णालयामध्ये काही डॉक्टरांकडून कितीतरी रुग्णांची लूट होत असल्याचे दिसून आले.'

तसंच, 'एका रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी करतानाची एक व्हिडीओ क्लीप आम्ही शूट केली आहे. ती आमच्याजवळ आहे. असे किती तरी रुग्ण आणि नातावाईक असतील जे नाइलाजाने अशा डॉक्टरांच्या लूटचा शिकार होऊन त्रस्त असतील. डॉक्टर आणि संबंधित स्टाफ बाहेरून परवानगी नसताना औषधे पुरवणारे एजंट यांच्यावर एसआयटी मार्फत कारवाई करण्यात यावी.', अशी मागणी महाराष्ट्र मुस्लीम कॉन्फर्स संघटनेने केली आहे.

Sassoon Hospital: ससून रुग्णालयामध्ये रुग्णांची लूट सुरू,  स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
Pune Crime News : पिण्याचं पाणी मागितल्याने वाद; पुण्यात लोखंडी रॉडने वार करत तरुणाची हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com