Pune Accident News: पुण्यातील मार्केट यार्ड भागात भीषण अपघात; भरधाव डंपरची दुचाकीला धडक, महिला जागीच ठार

Woman Death In Dumper Hit Bike At Gangadham Chowk: पुण्यातील मार्केट यार्ड भागात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
मार्केट यार्ड भागात भीषण अपघात
Pune Accident NewsSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुण्यातील मार्केट यार्ड भागात असलेल्या गंगाधाम चौकात भीषण अपघात झाला आहे. गंगाधाम चौकात एका भरधाव ट्रकने महिलेला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या अपघातातील ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं (Pune Accident News) आहे. या चालकावर गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा अपघात दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला आहे. आई माता मंदिर रोड येथे एका डंपरने दुचकीस पाठीमागुन धडक दिली.

महिलेचा जागीच मृत्यू

त्यामुळे या दुचाकीवर असलेलली एक महिला जागीच मृत्युमुखी पडली, तर दुसरी महिला गंभीर ज़ख़मी झालेली आहे. जखमी महिलेस उपचारकामी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले (Dumper Hit Bike At Gangadham Chowk) आहे. तर मृत्यू झालेल्या मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

मार्केट यार्ड भागात भीषण अपघात
Nanded Accident News: नांदेडमध्ये भीषण अपघात; दुचाकी दीड किलोमीटर फरफटत नेली, एकाचा मृत्यू, अपघातानंतर ट्रक पेटली

कालची घटना

दोन पीएमपीए बसमध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना (Accident News) काल (११ जून) पुण्यातील कात्रज चौकात घडली होती. कात्रज जुन्या बसस्थानकाजवळ पीएमपीची बस तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. ती बस टोइंग करून काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मात्र जागीच मृत्यू झाला. गणेश गुजर (वय ४२) असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव (Road Accident) आहे. गुजर कंत्राटी कामगार म्हणून कात्रज आगारात काम करत असल्याची माहिती मिळतेय.

मार्केट यार्ड भागात भीषण अपघात
Raigad Accident News: वाढदिवसालाच मृत्यूने गाठलं! पार्टीला जाताना भीषण अपघात, 'बर्थडे बॉय'चा दुर्दैवी अंत; गाडीचे २ तुकडे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com