Raigad Accident News: वाढदिवसालाच मृत्यूने गाठलं! पार्टीला जाताना भीषण अपघात, 'बर्थडे बॉय'चा दुर्दैवी अंत; गाडीचे २ तुकडे

Raigad Breaking News: कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात बर्थडे बॉयचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यात घडली. वाढदिवसादिवशीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Raigad Accident News: वाढदिवसालाच मृत्यूने गाठलं! पार्टीला जाताना भीषण अपघात, 'बर्थडे बॉय'चा दुर्दैवी अंत; गाडीचे २ तुकडे
Raigad Breaking News: Saamtv

सचिन कदम, रायगड|ता. १२ जून २०२४

वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रांसोबत निघालेल्या बर्थडे बॉयचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यात घडली. आदित्य ठमके असे मृत तरुणाचे नाव असून या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाढदिवसाच्या दिवशीच 17 वर्षीय तरूणाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील रसायनी दांडफाटा येथे घडली. आदित्य ठमके असं मृत तरुणाचे नाव आहे. काल (मंगळवार, ११ जून) त्याचा वाढदिवस होता.

घरी वाढदिवस साजरा केल्यानंतर आदित्य ठुमके आपल्या मित्रांना पार्टी देण्यासाठी रसायनी दांडफाटा येथे चालला होता. यावेळी त्यांच्या दुचाकीचा आणि एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात बर्थडे बॉय आदित्यचा जागीच मृत्यू झाला.

Raigad Accident News: वाढदिवसालाच मृत्यूने गाठलं! पार्टीला जाताना भीषण अपघात, 'बर्थडे बॉय'चा दुर्दैवी अंत; गाडीचे २ तुकडे
Uddhav Thackeray: निवडणुकीत मतदारांनी खडे चारले, आता तरी सुधारणार की पक्षांना संपवणार? ठाकरेंचा भाजपला खोचक सवाल

हा अपघात इतक भयंकर होता की मोटार सायकलचे अक्षरशः दोन तुकडे झाले. तर कारचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, वाढदिवसाचा आनंद साजरा करत असतानाच बर्थडे बॉयवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेने मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Raigad Accident News: वाढदिवसालाच मृत्यूने गाठलं! पार्टीला जाताना भीषण अपघात, 'बर्थडे बॉय'चा दुर्दैवी अंत; गाडीचे २ तुकडे
Nilesh Lanke At Delhi: 'जायंट किलर' खासदार निलेश लंके दिल्लीत! संसदेत पाऊल ठेवताच म्हणाले, 'मी इंग्रजी शिकणार....'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com