Nilesh Lanke At Delhi: 'जायंट किलर' खासदार निलेश लंके दिल्लीत! संसदेत पाऊल ठेवताच म्हणाले, 'मी इंग्रजी शिकणार....'

NCP MP Nilesh Lanke Delhi News: लोकसभा निवडणुकीत बलाढ्य विखे पाटलांच्या साम्राज्याला हादरा देत खासदारकी मिळवल्यानंतर निलेश लंके आज दिल्लीत पोहोचले. दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच प्रचारामध्ये गाजलेल्या इंग्रजीच्या मुद्द्यावरुनच महत्वाचे विधान केले.
Nilesh Lanke At Delhi: 'जायंट किलर' खासदार निलेश लंके दिल्लीत! संसदेत पाऊल ठेवताच म्हणाले, 'मी इंग्रजी शिकणार....'
NCP MP Nilesh Lanke Delhi News:Saamtv

दिल्ली, ता. १२ जून २०२४

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विखे पिता- पुत्रांचा अभेद्य किल्ला भेदत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले. या निवडणूक प्रचारात महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनी समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येते का? म्हणत लंकेंना डिवचले होते. आता विजयानंतर पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचलेले निलेश लंके यांनी याच इंग्रजीच्या मुद्द्यावरुन सुजय विखेंना टोला लगावला आहे.

काय म्हणाले निलेश लंके?

दिल्ली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी नवीन आहे. दिल्ली आणि लोकसभा दोन्ही माझ्यासाठी नवी आहे. माझ्या मतदार संघातील जनतेने मला संधी दिली, स्वप्नात पाहिलेली दिल्ली आणि आता आज संसदेत जाण्याचा भाग्य मिळतं आहे, असे खासदार निलेश लंके म्हणाले. तसेच मी इंग्रजी शिकणार आहे, ज्याला जस समजेल तस उत्तर द्यावं लागेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

"तसेच विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी शुभेच्छा दिल्या नाहीत मात्र त्यांच्या शुभेच्या सोबत आहेत अस गृहीत धरायचं. कांदा, दूध, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते लोकसभेत मांडणार. मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे, राजमार्गने पुढे जाऊन यश मिळवायचं आहे," असेही निलेश लंके यावेळी म्हणाले.

Nilesh Lanke At Delhi: 'जायंट किलर' खासदार निलेश लंके दिल्लीत! संसदेत पाऊल ठेवताच म्हणाले, 'मी इंग्रजी शिकणार....'
Maharashtra Politics: ब्रेकिंग! कोकण पदवीधर निवडणुकीतून ठाकरे गटाची माघार; काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा

दरम्यान, नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निलेश लंकेंविरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यामध्ये लढत झाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तुतारी चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या लंकेंसमोर विखे पाटलांचे बलाढ्य आव्हान होते. त्यामुळे या हायहोल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत निलेश लंकेंनी आघाडी घेत विजय संपादन केला.

Nilesh Lanke At Delhi: 'जायंट किलर' खासदार निलेश लंके दिल्लीत! संसदेत पाऊल ठेवताच म्हणाले, 'मी इंग्रजी शिकणार....'
Ayodhya NSG Hub: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अयोध्येत बनणार NSG हब, रामनगरीला ब्लॅक कैट कमांडोंचे 'अभेद्य' सुरक्षा कवच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com