Ayodhya NSG Hub: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अयोध्येत बनणार NSG हब, रामनगरीला ब्लॅक कैट कमांडोंचे 'अभेद्य' सुरक्षा कवच

Ayodhya NSG Hub Breaking News: प्रभु श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये लाखो भाविक गर्दी करत असतात. अयोध्या नगरीत होणारी गर्दी पाहता केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला असून अयोध्येत एनएसजी हब बनवले जाणार आहे.
Ayodhya NSG Hub: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अयोध्येत बनणार NSG हब, रामनगरीला ब्लॅक कैट कमांडोंचे 'अभेद्य' सुरक्षा कवच
Ayodhya Ram MandirSaam Tv
Published On

दिल्ली, ता. १२ जून २०२४

उत्तर प्रदेशमधील अयोध्या नगरीत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) हब तयार केले जाणार आहे. प्रभु श्रीराममंदिरामुळे अयोध्या नगरी देशात सर्वात महत्वाचे तिर्थक्षेत्र बनले आहे. याठिकाणी दररोज लाखो भाविकांची गर्दी होती. याच पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि दहशतवादाच्या संभाव्य धोक्याचा विचार करून केंद्र सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याच्या घटना घडल्या. काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत झालेल्या तीन दहशतवादी हल्ल्यांनंतर देशभरात संवेदनशील भागांच्या सुरक्षेवर भर देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अयोध्यामध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्ड हब तयार करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

अयोध्या नगरीत राममंदिर उभारल्यापासून त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राममंदिरात भेट देण्यासाठी दररोज दीड लाखांहून अधिक भाविक येत असतात. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. अयोध्येत एनएसजीचे हब तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना तयार करण्यात आली आहे. दहशतवादाच्या संभाव्य धोक्याचा विचार करून केंद्र सरकारने एनएसजी हब बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

Ayodhya NSG Hub: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अयोध्येत बनणार NSG हब, रामनगरीला ब्लॅक कैट कमांडोंचे 'अभेद्य' सुरक्षा कवच
Maharashtra Politics: ब्रेकिंग! कोकण पदवीधर निवडणुकीतून ठाकरे गटाची माघार; काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा

कशी असेल सुरक्षा?

अयोध्येत एनएसजीचे केंद्र तयार केले जाईल. दहशतवादी धोक्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना बनवली आहे. राम मंदिर आणि रामभक्तांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एनएसजीकडे दहशतवादविरोधी आणि अपहरणविरोधी कारवायांचे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारचा दहशतवादी धोका असल्यास दिल्लीतून एनएसजी कमांडो पाठवण्याऐवजी त्याला सामोरे जाण्याची जबाबदारी तेथे तैनात असलेल्या ब्लॅक कैट कमांडोकडे असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com