Pune Breaking News Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: १५ दिवसात पुण्यातील ४० हजार दुकानांवर झळकणार 'मराठी' पाट्या; मनसे पदाधिकारी- व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय!

Pune Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या १५ दिवसात पुणे शहरातील ४० हजार व्यापारी दुकानांवर मराठी पाट्या लावणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. ४ डिसेंबर २०२३

Pune MNS News:

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. अनेक शहरांमध्ये मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांना मनसेने खळखट्याळ इशारा दिलाय.

तीन दिवसांपूर्वी पुणे शहरातील जंगली महाराज रस्ता व टिळक रोडवरील मराठी पाट्या नसलेल्या दुकानाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आज मनसे पदाधिकारी आणि शहरातील व्यापाऱ्यांमध्ये बैठक पार पडली ज्यामध्ये दुकानांवरील मराठी पाट्यांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत काय घडलं?

मराठी पाट्या संदर्भात पुणे शहरातील व्यापारी (Pune) संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक पार पडली. पुणे शहर मनसे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थितीत होते तर व्यापारी महासंघाकडून फत्तेचंद रांका, ग्राहक मंचाचे सूर्यकांत पाठक यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते.

१५ दिवसात दुकानांवर झळकणार मराठी पाट्या..

या बैठकीमध्ये मराठी पाट्यांंसंदर्भात (Marathi Name Plate) सकारात्मक चर्चा झाली. मनसेच्या (MNS) मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या १५ दिवसात पुणे शहरातील ४० हजार व्यापारी दुकानांवर मराठी पाट्या लावणार असल्याचा निर्णय या बैठकीत झाला. मराठी पाट्यांबाबत महापालिकेचे आडमुठी धोरण असल्याने पाट्या लावण्यास अडचणी येत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली.

तसेच व्यापाऱ्यांच्या इतरही काही अडचणी आहेत, त्याबाबत काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी बैठक करून त्या सोडवण्यात येतील, असे आश्वासनही देण्यात आले आहे. दरम्यान, मराठी पाट्यांसंदर्भात व्यापारी महासंघाने सकारात्मक पाऊल उचलल्याने मनसे पदाधिकारी स्वागत व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT