MNS Protest For Marathi Patya: मनसैनिकांनी इंग्रजी पाट्या फाेडल्या, शहापूर, वर्धामध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक; पुण्यात आज आंदाेलन

मराठी भाषेचा सन्मान सर्वांनीच केलाच पाहिजे अशी भूमिका मनसेची नेहमीच राहिली आहे असे आंदाेलकांनी सांगितले.
mns andolan for marathi board in shahapur and wardha sml80
mns andolan for marathi board in shahapur and wardha sml80saam tv
Published On

फय्याज शेख / चेतन व्यास / सचिन जाधव

MNS Andolan For Marathi Patya :

मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्याने संपुर्ण राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्या संदर्भात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहापूर आणि वर्धा येथे मनसैनिकांनी (MNS Karyakata) मराठी पाट्यांसाठी आंदाेलन छेडले तसेच स्थानिक प्रशासनास निवेदन दिले. (Maharashtra News)

शहापूरला इंग्रजी पाट्या फोडल्या

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या आग्रही भूमिकेमुळे काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. ज्या राज्यात आपला व्यवसाय, दुकान किंवा आस्थापना आहे.

तेथील भाषेचा सन्मान करणे. हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. व्यापारासाठी महाराष्ट्रात येत असाल तर महाराष्ट्रातील मराठी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे अशी भूमिका मनसेची नेहमीच राहिली आहे. महाराष्ट्रातील मनसैनिकांनी या मुद्द्यावर संघर्ष केला असून शहापूर तालुक्यातील हाॅटेल, कंपन्या व दुकानाच्या इंग्रजी पाट्या फोडल्या.

mns andolan for marathi board in shahapur and wardha sml80
Kolhapur: कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांचा संप; बस सेवा ठप्प

शहापूर तालुक्यातील सरकारी आस्थापना, दुकान, कंपन्या येथे लावण्यात आलेले हिंदी, इंग्रजी फलक तात्काळ हटवून त्या ठिकाणी ठळकपणे मराठी फलक लावण्यात यावे यासाठी शहापूरातील मनसैनिक (mns) आक्रमक झाले आहेत.

याबाबतचे निवेदन शहापूर तहसीलदार कोमल ठाकूर यांना शहापूर मनसेचे (shahapur mns) सचिव हॅरी खंडवी यांनी दिले. शहापूर तालुक्यात सर्वत्र मराठी पाट्या लावण्यासाठी शहापूर तहसीलदारांनी आदेश पारित करावे अशी मागणी देखील मनसैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

वर्धा मनसैनिक मराठी पाट्यांसाठी आग्रही

सर्वोच्च न्यायालयाने अस्थापने व दुकानांना मराठीतून नाम फलक लावण्याच्या सूचना केल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. वर्ध्यातील दुकाने व अस्थापनांना मराठी भाषेतून फलक लावण्याचे आदेश द्यावे व सात दिवसात फलक लागले नाहीय तर मनसेकडून आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेच्या (wardha mns) शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

पुण्यात मनसेचे आज आंदोलन

पुणे शहरात देखील मराठी पाट्या संदर्भात मनसे (pune mns) आक्रमक झाली आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता टिळक चौक येथून मनसे आंदोलन छेडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पुणे महापालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाट्या मराठीत न केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी याबाबत महानगरपालिकेला मनसेने पत्रही दिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

mns andolan for marathi board in shahapur and wardha sml80
Nagpur News : पीक विमा तक्रारीसाठीचे ऍप्लिकेशन ठप्प, तक्रारी नोंदविता येत नसल्याने ठाकरे गट आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com