Nagpur News : पीक विमा तक्रारीसाठीचे ऍप्लिकेशन ठप्प, तक्रारी नोंदविता येत नसल्याने ठाकरे गट आक्रमक

विमा प्रतिनिधीच्या अंगावर धानाच सडलेले पीक टाकून ठाकरे गटाने संताप व्यक्त केला.
nagpur farmers lose crops uddhav thackeray faction demands mah gov immediate help
nagpur farmers lose crops uddhav thackeray faction demands mah gov immediate helpsaam tv
Published On

- पराग ढाेबळे

Unseasonal Rain Hits Nagpur News :

नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका मौदा तालुक्याला बसला आहे. शेतकऱ्यांचे धान, इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतावर जाऊन पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी जाेर धरु लागली आहे. (Maharashtra News)

दरम्यान विमा कंपनीचे पदाधिकारी हे उडवा उडवीचे उत्तर देत असल्याचा दावा करीत संतप्त होत उबाठा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गोडबोले यांनी मौदा येथील विमा प्रतिनिधीच्या अंगावर धानाच सडलेले पीक (कडप) टाकून संताप व्यक्त केला.

nagpur farmers lose crops uddhav thackeray faction demands mah gov immediate help
Unseasonal Rain : अवकाळीचा फटका; पंढरपूर तालुक्यात ११ हजार एकरावरील द्राक्ष बागांचे नुकसान

अवकाळी पावसामुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांना आधी तातडीने मदत द्या अशी मागणी करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने शेतकऱ्यांसह तहसीलदाराना निवेदनातून केली.

पीक विमाची तक्रारीसाठीचे अप्लिकेशन काम करत नसल्याने तक्रारी नोंदविता येत नाही. लवकरात लवकर पंचनामा होणे गरजेचे आहे. पीक विमा कंपन्या लक्ष देत नसून शासनाने त्यांच्यावर कारवाईची मागणीही यावेळी निवेदनातून केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

nagpur farmers lose crops uddhav thackeray faction demands mah gov immediate help
Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com