Viral Video: सुसाट गाड्या, पैशांचा पाऊस अन् थरारक स्टंट... मस्ती महागात पडली; भरावा लागला लाखोंचा दंड| VIDEO

UP Viral Video: नोयडामध्ये रस्त्यावर केलेली स्टंटबाजी काही तरुणांना चांगलीच महागात पडली असून पोलिसांनी त्यांना लाखोंचा दंड ठोठावला आहे.
Viral Video
Viral VideoSaamtv

Noida Car Stunt Viral Video:

सध्याच्या तरुणाईला लागलेले सोशल मीडियाचे वेड भयंकर आहे. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी तरुण- तरुणी अनेक प्रताप करत असतात. लग्नांमध्ये, कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये स्टंटबाजी करत अनेक जण लक्ष वेधून घेत असतात. मात्र अशी स्टंटबाजी अनेकदा चांगलीच महागातही पडते.

उत्तरप्रदेश नोयडामधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. नोयडामध्ये रस्त्यावर केलेली स्टंटबाजी काही तरुणांना चांगलीच महागात पडली असून पोलिसांनी त्यांना लाखोंचा दंड ठोठावला आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण, जाणून घ्या सविस्तर.

उत्तरप्रदेश नोएडामधील (Uttar Pradesh Noida) एक व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुण भरधाव वेगात गाड्या पळवत स्टंटबाजी करताना दिसत आहेत.धक्कादायक बाब म्हणजे या तरुणांनी गाडीच्या सनरुफमधून नोटांची उधळणही केली. घरातील लग्न समारंभाच्या वरातीवेळी ही स्टंटबाजी केल्याचे सांगण्यात येत आहे.

 नोएडामधील सेक्टर 37 वरुन सिटी सेंटरला या गाड्या भरधाव वेगाने जात होत्या. या ताफ्यात एकूण पाच गाड्या होत्या. गाड्यांच्या सनरुफबरोबरच खिडकीमधून बाहेर डोकावत गाडीमधील प्रवासी नोटा दाखवत पैसे उधळत होते. त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या एका वाहनचालकाने हा थरारक स्टंट आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video
Rohit Pawar: 'पक्ष आमचाच, आता फक्त अजित पवार मित्रमंडळ..' राष्ट्रवादी संघर्षावर रोहित पवारांचं मोठे विधान; काय म्हणाले?

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोएडा वाहतूक पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. सोशल मीडिया तसेच परिसरातील सीसीटिव्हीच्या आधारे तपास घेत या स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी शोधून काढले असून त्यांना मोठा दंड केला आहे.

पोलिसांनी या सर्वांकडून प्रत्येकी ३३ हजार रुपये तसेच आधीचा थकीत ई- चलान असे मिळून तब्बल ३.९६ लाखांचा दंड वसूल केलायं. इतकेच नव्हेतर त्यांच्या गाड्याही जप्त केल्यात. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Viral Video
Viral Video: शीला की जवानीवर तरूणींचा धावत्या ट्रेनमध्ये भन्नाट डान्स, धिंगाना पाहून प्रवाशांचा फूल टाईमपास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com