Viral Stunt Video: मस्ती अंगलट आली! सुसाट बाईकवर स्टंट करत होता, मधेच तोल गेला अन्... थरारक अपघाताचा VIDEO

Bike Stunt Viral Video: तरुण वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर वेडीवाकडी बाईक चालवत लक्ष वेधत आहे. मात्र हा स्टंट (Stunt Video) करताना त्याचा गाडीवरील ताबा सुटतो आणि भीषण अपघात होतो.
Bike Stunt Viral Video
Bike Stunt Viral VideoSaamtv
Published On

Viral Accident Video:

सध्याच्या तरुणाईला लागलेले सोशल मीडियाचे वेड भयंकर आहे. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या एका तरुणाचा असाच एक धक्कादायक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामधील तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी त्याच्या चांगलीच अंगलट आल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) बाईक स्टंटचे (Bike Stunt Viral Video) अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी भरधाव गाडीवर विचित्र कृती करताना तर कधी चक्क तरुणीसोबत गाडीवर रोमान्स करतानाचे व्हिडिओ अनेकदा लक्ष वेधतात. अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमधील बाईकस्वार चालू गाडीवर स्टंट करताना दिसत आहे.

हा तरुण वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर वेडीवाकडी बाईक चालवत लक्ष वेधत आहे. मात्र हा स्टंट (Stunt Video) करताना त्याचा गाडीवरील ताबा सुटतो आणि भीषण अपघात होतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bike Stunt Viral Video
Sanjay Raut on Assembly Election Result : छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव धक्कादायक, तेलंगणातील निकाल अनपेक्षित : संजय राऊत

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण त्याची भरधाव स्कूटी पळवताना दिसत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असतानाच तो गाडीचा समोरील टायर उचलून फक्त पाठीमागच्या चाकांवर गाडी पळवतोय. अचानक गाडीवरील ताबा सुटतो आणि गाडी जोरात पडते. रस्त्याच्या कठड्यावर आदळून गाडी रस्त्यावर घसरत जाते.

सुदैवाने या अपघातात तरुणाला कोणतीही गंभीर जखम झाली नाही. रस्त्यावरीलच एका वाहनचालकाने हा अपघाताचा थरार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून तरुणावर कारवाईची मागणी केली आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांमुळेच अपघात होतात, असे नेटकऱ्यांनी म्हणले आहे. (Latest Marathi News)

Bike Stunt Viral Video
Rajsthan Election: काय आहे कन्हैयालाल हत्याकांड प्रकरण? काय आहे त्या जागांचा निकाल?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com