Maharashtra Politics: मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, वर्षावर खलबतं, कारण काय?

Raj Thackeray Meet Cm Eknath Shinde: राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मराठी पाट्यांसाठी आक्रमक झालेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेत. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.
Raj Thackeray Meet Cm Eknath Shinde
Raj Thackeray Meet Cm Eknath ShindeSaamtv
Published On

Raj Thackeray Meet Cm Eknath Shinde:

राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मराठी पाट्यांसाठी आक्रमक झालेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. या भेटीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मात्र मराठी पाट्या तसेच टोलप्रश्नांसंबंधी ही भेट असल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती शी की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (शनिवार, २ डिसेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसे आमदार राजू पाटील हे देखील उपस्थित होते.

राज्यात सध्या दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कार्यकर्ते आक्रमक झालेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मनसेने मराठी पाट्यांसाठी मोहिम सुरू केली असून खळखट्याळचा इशाराही दिला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच मनसेने टोलबंदी संदर्भात पुन्हा आक्रमक भूमिका घेतली होती. याच महत्वांच्या प्रश्नांवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये ही भेट झाली सांगितले जात आहे.

Raj Thackeray Meet Cm Eknath Shinde
Delhi Court : २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अजित पवार गटाच्या नेत्याला जामीन मंजूर, जाणून घ्या प्रकरण

मुख्यमंत्र्यांची पोस्ट..

"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली. या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) उपस्थित होते," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com