Delhi Court : २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अजित पवार गटाच्या नेत्याला जामीन मंजूर, जाणून घ्या प्रकरण

साखर पुरविण्याचा करारानंतर त्याचे पालन झाले नसल्याचाही आराेप.
delhi court orders ranjitsinh shinde six months imprisonment
delhi court orders ranjitsinh shinde six months imprisonmentsaam tv
Published On

Pandharpur News :

धनादेश न वटल्याप्रकरणी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे (ranjitsinh shinde) व रणजित बोरावके यांना दिल्लीच्या साकेत न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी ट्विंल चावला यांनी सैनिक फूड्स लिमिटेड कंपनीला साडेसात कोटीची नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला आहे. तसेच सहा महिने साध्या कारावासाची शिक्षाही ठोठावली आहे. दरम्यान त्यांना न्यायालयाने २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. (Maharashtra News)

अजित पवार (ajit pawar) गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे (mla babanrao shinde) यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे अध्यक्ष असलेल्या कर्नाटकातील इंडियन शुगर या साखर कारखान्याचे सैनिक फूड्स प्रा. लि कंपनी सोबत साखर पुरविण्याचा करार झाला होता. त्यासाठी कंपनीने १० कोटी रुपये दिले होते. त्यापोटी साखर कारखान्याने ५२०० मेट्रिक टन साखर पुरविणे अपेक्षित होते.

delhi court orders ranjitsinh shinde six months imprisonment
Solapur Crime News: लाखाची मागणी करणारा फौजदार एसीबीच्या जाळ्यात, सोलापूर एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परंतु, २०१६-१७ मध्ये १९४२ टन साखर पुरविली. त्यामुळे कारखान्याकडून आठ कोटी ३९ लाख रुपये देणे होते, तर त्यांच्याकडून कंपनीला १० कोटी ६२ लाख ८९ हजार रुपये येणे होते. त्यापोटी कारखान्याने चडचण येथील सिंडिकेट बँकेचा पाच कोटींचा धनादेश दिला होता. खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटला नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे कंपनीने दिल्लीच्या न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने कारखान्याचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी कंपनीला साडेसात कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश आणि सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. त्यांना न्यायालयाने २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

delhi court orders ranjitsinh shinde six months imprisonment
Raigad Shocking News : आईनं २ मुलींसह केली आत्महत्या; कोकणकन्या एक्स्प्रेसखाली उडी घेत संपवलं जीवन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com