Solapur Crime News: लाखाची मागणी करणारा फौजदार एसीबीच्या जाळ्यात, सोलापूर एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेमुळे साेलापूर पाेलीस दलात खळबळ उडाली आहे.
Bribe Trap
Bribe TrapSaam tv

Solapur Crime News :

गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी दोन लाखांची मागणी करून एक लाख रुपये तडजोडीने लाचेची मागणी करून स्वीकारण्यास संमती दिल्याचे सिद्ध झाल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याचा फौजदार विक्रम प्रतापसिंह रजपूत (vikram pratap singh rajput) यास एसीबीच्या पथकाने अटक केली. रजपूत ज्या पाेलीस ठाण्यात कार्यरत आहे त्याच पाेलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra News)

या प्रकरणात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी फौजदार विक्रम प्रतापसिंह रजपूत याने स्वतःसह पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या नावे २ लाखांची मागणी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तडजोडीअंती ही रक्कम १ लाखावर आणून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीच्या ६ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले.

Bribe Trap
Ragunathdada Patil: साखर कारखान्यांतून साखर बाहेर पडू देणार नाही : रघुनाथदादा पाटील

फौजदार रजपूत याने बेकायदेशीररीत्या लाच म्हणून रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ आणि ७ अ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे अशी माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Bribe Trap
Shashikant Shinde : आमदार शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार ? जाणून घ्या प्रकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com